आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज (23 नोव्हेंबर, शुक्रवार) कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये ही तिथी अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी करण्यात आलेल्या दान, जपाचे दहा यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होते. या दिवशी कृत्तिका नक्षत्र असल्यास याचे महत्त्व अधिकच वाढते. ज्योतिषमध्ये याला महाकार्तिकी म्हटले गेले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, कार्तिक पौर्णिमेला काही खास काम केल्यास याचे शुभफळ प्राप्त होतात. हे काम पुढीलप्रमाणे आहेत...
आज करा हे 5 काम...
1. कार्तिक पौर्णिमेला सकाळी एखाद्या नदी किंवा तलावामध्ये स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.
2. कार्तिक पौर्णिमेला भगवान सत्यनारायणची कथा ऐकण्याचेही विधान आहे. हे शक्य नसल्यास भगवान विष्णूंची पूजा करावी.
3. संध्याकाळी घर, मंदिर, चौक आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे घर-कुटुंबात सुख-समृद्धी राहते.
4. या दिवशी गरजू लोकांना दान करण्याची प्रथा आहे. शक्य असल्यास गरम कपडे आणि अन्नदान करावे.
5. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि खालील मंत्राचा उच्चार करावा. यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.
वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम।
य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.