आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावर्षी 22 आणि 23 नोव्हेंबरला कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. 22 तारखेला व्रत पौर्णिमा आणि 23 तारखेला स्नान दान पौर्णिमा आहे. या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करून दान करण्याची प्रथा आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या पूर्ण कलांमध्ये दिसतो. ही रात्र पूजा-पाठ करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते. चंद्रासमोर करण्यात आलेल्या पूजेचे शुभफळ लवकर मिळू शकते. येथे जाणून घ्या, पौर्णिमेला कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात...
1. पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदयानंतर चांदीच्या कलशाने चंद्राला दूध आणि पाण्याने अर्घ्य द्यावे. ऊँ सों सोमाय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
2. कार्तिक पौर्णिमेला एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे. स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. जल अर्पण करावे. मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि सात प्रदक्षिणा घालाव्यात.
3. पौर्णिमेला चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला कच्च्या दुधात तांदूळ आणि खडीसाखर टाकून अर्घ्य द्यावे.
4. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा करावी. पूजेमध्ये 11 पिवळ्या कवड्या, गोमती चक्र ठेवावे. पूजा झाल्यानंतर ही सामग्री तोजोरीत ठेवावी.
5. महालक्ष्मी आणि श्रीविष्णूंची पूजा करावी. दक्षिणावर्ती शंखामध्ये दूध भरून अभिषेक करावा. दुधामध्ये केशर टाकून हे दूध शंखामध्ये भरून अभिषेक करावा.
6. महालक्ष्मीच्या मंदिरात जावे आणि देवीला हळकुंड, अत्तर, गुलाबाचे फुल अर्पण करावे. देवी लक्ष्मीसमोर स्वतःच्या कपाळावर केशराचा टिळा लावावा.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार उपाय...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.