आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुष्टियुद्धाच्या यशोशिखरावर ‘दिया’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

करुणा भांडारकर

अभ्यास, खेळात ताळमेळ साधत दोन्ही क्षेत्रांत हमखास यश मिळवता येते, याचा आदर्श मुष्टियुद्धपटूू दिया बचे हिने घालून दिलाय. राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तिने नुकताच मिळवला आहे.  


दिया मूळ अकोल्याची. ती प्रभात किड्सची विद्यार्थिनी. ‘प्रभात’मध्ये अभ्यासासोबत विद्यार्थ्यांची शारीरिक सक्षमता वाढवण्यावरही भर दिला जातो. हेच वातावरण दियाला विविध खेळांकडे आकर्षित करणारे ठरले. ७ व्या वर्गापर्यंत तिने अनेक खेळांत हात आजमावले. पदकेही पटकावली. 

दरम्यान, बॉक्सिंगविषयी आवड निर्माण झाली. त्यामुळे ८ व्या वर्गापासून पूर्णवेळ बॉक्सिंगला वाहून घेतले. शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. मागील ७ वर्षांपासून दिया बॉक्सिंगचा सराव करते आहे. सध्या ती अकोला क्रीडा प्रबोधिनीची नियमित खेळाडू आहे. आतापर्यंत दियाने अनेक शालेय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय सुवर्णपदकांवर नाव कोरले. तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभवही घेतला. मात्र या प्रवासात अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून आहोत, खेळात कधी काही होऊ शकते. याची जाणीव तिला आहे. त्यामुळे बॉक्सिंगमध्ये उच्च शिखरावर असताना नाममात्र शिक्षण न घेता अभियांत्रिकी(सिव्हिल)अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.  प्रथम वर्षात संपूर्ण विषय उत्तीर्णही केले. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ग, प्रात्यक्षिक करून खेळाचा सरावही ती नियमित करते.  तिच्या या परिश्रम व जिद्दीला सलामच! दियाची कामगिरी

  • राज्यस्तरावर ९ सुवर्ण
  • राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य व रजत
  • खेलो इंडियामध्ये कांस्य
  • चार वेळा ‘महाराष्ट्राची बेस्ट बॉक्सर’ पुरस्कार
  • अकोला भूषण व युवा भूषण पुरस्काराची मानकरी
  • युनिव्हर्सिटी कलर कोट होल्डर

महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व 


अकोल्यात झालेल्या १९ व्या वरिष्ठ महिला बॉक्सिंग स्पर्धेत दियाने ४२ किलो वजन गटात सुवर्णपदक पटाकावले. आता ती केरळमध्ये २ ते १९ डिसेंबर २०१९ दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ महिला बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.लेखिकेचा संपर्क ९३४००६१८२०