आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवा चौथ : ही पूजा इतर पूजेपेक्षा वेगळे आहे, पूजन विधीमध्ये संपूर्ण सृष्टीला केले जाते समाविष्ट, व्रताचे असतात 5 साक्षी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 27 ऑक्टोबर रोजी करवा चौथ व्रत आहे. विवाहित महिलांसाठी हे सर्वात महत्त्वपूर्ण व्रत मानले जाते. पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशसहित जवळपास संपूर्ण भारतात हे व्रत उत्साहाने केले जाते. महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून पतीच्या हाताने पाणी पिऊन हे व्रत सोडतात. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, करवा चौथ व्रतामध्ये सौभाग्यवती महिला केवळ चौथ देवीकडे सौभाग्याचे वरदान मागत नाहीत तर यामध्ये संपूर्ण सृष्टीला समाविष्ट केले जाते. ही सृष्टी पाच तत्त्वापासून तयार झाली आहे. यामध्ये पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश हे तत्त्व आहेत. हे पाचही तत्त्व या पूजेचे साक्षी आहेत.


करवा : मातीचा करवा (मातीचे कलशाप्रमाणे भांडे) पृथ्वी तत्त्वाचे प्रतीक आहे. या व्रतामध्ये सकाळी करवामध्ये पूजेसाठी पाणी भरले जाते. या भांड्यातील पाण्याने पत्नी चंद्राच्या पूजेनंतर पतीसोबत पाणी पिते. याच करव्याला व्रताचा पहिला साक्षी म्हणजे पृथ्वी तत्त्व मानले गेले आहे.


जल - करवामध्ये भरलेले पाणी जल तत्त्वाचे प्रतीक आहे. करवा चौथ पूजेमध्ये सौभाग्यवतीच्या व्रताचा दुसरा साक्षी पाणी आहे. हेच पाणी पिऊन व्रत सोडले जाते.


चंद्राची पूजा - दिवसभर उपवास करून व्रत केल्यानंतर रात्री चंद्राची पूजा केली जाते. चंद्र आकाशात विराजित आहे. चंद्राच्या माध्यमातून तिसरा साक्षी आकाशाला व्रतामध्ये समाविष्ट केले जाते. या कारणामुळेही चंद्राची पूजा केली जाते. हे आकाश तत्त्वाचे प्रतीक आहे.


दिवा - चाळणीतून चंद्र आणि पतीचे दर्शन घेताना चाळणीत दिवाही ठेवला जातो. हे अग्नी तत्त्वाचे प्रतीक आहे. या व्रताचा चौथा साक्षीदार अग्नी आहे.


वायू - या व्रताची पूजा घरात नाही तर खुल्या मैदानावर किंवा छतावर केली जाते. मोकळ्या हवेत. हे वातावरणच वायू मंडळाचे प्रतीक असते. जे या व्रताचा पाचवा साक्षी मानले गेले आहे.


अशाप्रकारे सौभाग्यवती महिला संपूर्ण सृष्टीला या व्रतामध्ये समाविष्ट करून घेतात. पंचतत्त्वाचा समावेश इतर कोणत्याही व्रतामध्ये दिसून येत नाही. यामुळे हे व्रत अत्यंत खास मानले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...