आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाची अवस्था पाहुन सुनेला दिला नवऱ्याला सोडण्याचा सल्ला, पण सुन होती आपल्या निश्चयावर ठाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगरूर (पंजाब) -  नशेच्या अवस्थेत 5 वर्ष ज्या नवऱ्याने बायकोला करवाचौथच्या दिवशा पाणी पाजले नाही. आज तोच नवरा व्यसनातून मुक्त झाल्यापासुन करवाचौथच्या दिवशी दिवसभर आपल्या बायकोसोबत असतो. बऱ्याचवेळा नशा न मिळाल्याने नवऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या मुलाची अवसथा पाहुन सासरच्या मंडळींनी सुनेला नवऱ्याला सोडून माहेरी जाण्याचा सल्ला दिला परंतू उच्चशिक्षीत पत्नीने नवऱ्याला व्यसनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

 

मुलाची अवस्था पाहुन सुनेला दिला नवऱ्याला सोडण्याचा सल्ला
संगरूर येथील परमिंदर कौरचा विवाह 10 वर्षांपूर्वी झाला होता.  लग्नानंतर तिला समजले की, आपला पति व्यसनाधीन आहे.  तिने त्याला व्यसन न करण्याची विनंती केली पण त्याने ऐकले नाही. विवाहित जीवनासोबतच पतीच्या मद्यपानाची सवय देखील वाढली. व्यसनामुळे त्याचा स्वत: वर ताबा राहत नव्हता.  मुलाच्या अशा स्थितीमुळे संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक देखील चिंतित होते. परंतु पती व्यसन सोडण्यास तयार नव्हता. अखेर सासरच्या मंडळींनी सुनेला माहेरी जाण्यात सांगितले पण आपल्या नवऱ्याला या नरकातून बाहेर काढण्याचा तिने निश्चय केला.

 

नवऱ्याला नरकातून बाहेर काढण्याचा केला निश्चय. 
परमिंदरचा नवरा 5 वर्षांपासून व्यसनाधीन आहे. गेल्यावर्षीपासुन त्याने अमली पदार्थ घेण्यात सुरूवात केली होती. एक दिवस नशेच्या धुंदीत गाईच्या गोठ्यात बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याच दिवसापासून परमिंदरने आपल्या नवऱ्याला या नरकातून बाहेर काढण्याचा निश्चय केला. 

 

जबरदस्तीने सोडवता येत नाही व्यसन  : मोहन शर्मा 
परमिंदर आपल्या नवऱ्याला घेऊन आल्या तेव्हा त्याची  अवस्था अत्यंत वाईट होती. त्याच्याशी बोलल्यानंतर तो व्यसन सोडण्यास तयार असल्याचे समजले. कोणत्याही रूग्णाचे जबरदस्तीने व्यसन सोडवता येत नाही. 2 वर्ष औषधोपचार घेतल्यानंतर तो आता व्यसनातून मुक्त झाला असल्याचे व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मोहन शर्मा यांनी सांगितले.

 

परमिंदर कौर आज आपल्या नवऱ्यासोबत सुखाने संसार करत आहे.  त्यांंचे असे म्हणणे आहे की, मागील 5 वर्षांत करवाचौथचा उपवास सोडण्यासाठी त्यांचे पती पाणी देत नव्हते पण आता ते करवाचौथच्या दिवशी संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत असतात. त्यांची काळजी घेतात. परमिंदर कौर पदवुत्तर असुन एका खासगी शाळेत शिक्षिका आहेत तर त्यांचे पति व्यसनमुक्त झाल्यापासुन शेतीचे कामं पाहतात.

 

बातम्या आणखी आहेत...