आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाडी गावाच्या रस्त्याचा प्रश्न जैसे थे, गरोदर महिलेला रुग्णालयात नेले खाटेवरुन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- एकीकडे राज्यात महामार्गांचे काम काम जोमाने सुरू आहे तर दुसरीकडे गावा मात्र रस्ताच नाहीये. वारंवार शासनाला सांगूनही रस्त्यांची कामे केली जात नाहीत. ही रस्त्यांची कामे पूर्ण केली नसल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावात रस्त्याचे काम जैसे थे आहे. प्रशासनाला वारंवार याबद्दल सूचना देऊनही गावातील रस्ताचे काम पूर्ण झालेले नाहीये. या खराब रस्त्यामुळे एका गरोदर महिलेला मोठ्या हाल अपेष्ठा सहन करुन रुग्णालयात जावे लागले.

 

सुवर्णा गणेश ढाकरे(25) या गरोदर महिलेला खाटेवरून रुग्णालयात न्यावे लागले. कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील बोल्डा-उमरा रस्त्यापर्यंत या महिलेला खाटेवर बसवून नेण्यात आले. या गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही स्थिती असून दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दैनिक दिव्य मराठी मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची स्वतःहून दखल घेत करवाडी येथील रस्त्याचा प्रश्न सोडण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. परंतु अद्याप या गावाला रस्ता मिळाला नाही.

 

या गावाच्या रस्त्यासाठी रोजगार हमी योजनेतून काम करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून कामासाठी नेते सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु हे काम मुळातच मे महिन्यात मंजूर करण्यात आल्यामुळे नंतरच्या काळात पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.