आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कसौटी जिंदगी....'मधील या अॅक्ट्रेसचा झाला बेबी शॉवर कार्यक्रम, मित्रांसोबत घेतला पजामा पार्टीचा आनंद; कास्टिंग काउचची शिकार ठरली होती ही अॅक्ट्रेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई : 'कसौटी जिंदगी की' आणि 'हेट स्टोरी 2' फेम अॅक्ट्रेस सुरवीन चावला लवकरच आई होणार आहे. तिने नुकतेच जवळील मित्रांसोबत बेबी शॉवरचा आनंद घेतला. या आनंदाच्या क्षणी सुरवीनने आपल्या मित्रांसोबत पजामा पार्टी केली. सोशल मीडियावर आलेल्या या फोटोजमध्ये सुरवीन आपल्या गर्लगँगसोबत मस्ती करताना दिसत आहे. या पार्टीत कसक बजाज, कीर्ति गायकवाड आणि शरद केळकरसह अनेक मित्र सहभागी झाले होते. 7 महिन्यांची गरोदर असलेली सुरवीन एप्रिल 2019 मध्ये मुलाला जन्म देऊ शकते. सुरवीन 2013 पासून बिझनसमन अक्षय ठक्करसोबत रिलेशनशिपमध्ये होती. एका मित्राद्वारे दोघांची भेट झाली होती. दोघांनी जानेवारी 2018 मध्ये लग्न करण्याचे ठरवले होते. पण निश्चित वेळेआधीच परिवारांच्या उपस्थितीत दोघांनी डिसेंबर 2015 मध्ये इटली येथे विवाह केला. सुरवीनने लग्नाच्या दोन वर्षानंतर 2017 मध्ये ही बातमी पब्लिकली शेअर केली होती.  


कास्टिंग काउची ठरली आहे शिकार 

> सुरवीनने एका मुलाखतीत एक खळबळजनक खुलासा केला होती. तिच्या मते, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला कास्टिंग काउचला समोरे जावे लागले होते. साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतेवेळी तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. 

 

या टीव्ही शोमधून केले होते पदार्पण

> सुरवीन चावला पंजाबी चित्रपटांतील एक मोठे नाव असून तिची टॉप अॅक्ट्रेसमध्ये गणना होते. चंडीगडमध्ये लहानाची मोठी झालेल्या सुरवीनने 2003 ते 2007 दरम्यान प्रसिद्ध टीव्ही शो 'कहीं तो होगा' द्वारे लहान पडद्यावर पाऊल ठेवले होते. 

> यानंतर ती 'कसौटी जिंदगी की'मध्ये श्वेता तिवारीच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. पण सोनी इंटरनॅशनल चॅनलवरील फॅमिली शो 'काजल'मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. 

> सुरवीनने 'कॉमेडी सर्कस के सुपरस्टार' नामक कॉमेडी शो देखील होस्ट केला आहे. याशिवाय डांसिंग रियालिटी शो 'एक खिलाडी एक हसीना'मध्ये तिने आपले नृत्य कौशल्य देखील दाखवले आहे. या शोमध्ये क्रिकेटर श्रीसंथ हा तिचा पार्टनर होता. 

 

'हेट स्टोरी-2'द्वारे बॉलीवूडमध्ये केले पदार्पण

> सुरवीनने 2014 मध्ये हेट स्टोरी-2 या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. यापूर्वी तिने अनेक दाक्षिणात्य आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते. 

> उंगली (2013), क्रिएचर 3डी (2014), वेलकम बॅक (2014), यासांकरख्या अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

> 2014 साली 'धरती' या चित्रपटातून पंजाबी चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. यासाठी तिला पीटीसी पंजाबी फिल्मचा बेस्ट फीमेल डेब्यू पुरस्कार देण्यात आला होता. 

> सुरवीनने 'तौर मित्रां दीं', 'साड्डी लव स्टोरी', 'सिंह v/s कौर' आणि 'लकी दी अनलकी स्टोरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

 

पुढे पाहा....बेबी शॉवर कार्यक्रमाचे इतर काही फोटोेज

बातम्या आणखी आहेत...