Home | News | kashinath ghanekar and thugs of hindostan movie compare

मराठमोळ्या 'डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटाला मिळतेय प्रेकक्षकांची पसंती, 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'ला केले चितपट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:25 PM IST

'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' सिनेमावर प्रेक्षकांनी दिल्या फनी रिअॅक्शन्स...

 • kashinath ghanekar and thugs of hindostan movie compare

  एन्टटेन्मेंट डेस्क. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बिग बजेट सिनेमा 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' प्रेक्षकांच्या भेटीला आला. यासोबतच मराठमोळा 'काशीनाथ घाणेकर' हा सिनेमाही रिलीज झाला. आता बहुचर्चित, 300 कोटींचं बजेट असणारा आणि तगडी स्टारकास्ट असलेला 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' आणि मराठमोठा 'काशीनाथ घाणेकर' सिनेमामध्ये स्पर्धा रंगणार हे ठरलेले होते. यांमधून कोणता सिनेमा हिट ठरणार असा प्रश्न होताच. पण एकाच दिवसात सर्व काही स्पष्ट झाले आहे. मराठमोठा 'काशीनाथ घाणेकर' या सिनेमाने बिग बजेट 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'ला चितपट केले आहे. प्रेक्षक 'काशीनाथ घाणेकर' सिनेमाला पसंती देत आहे.

  'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां'ला समीक्षकांनी दिले कमी रेटिंग
  - समीक्षकांनी सिनेमाचा चांगला रिव्ह्यूव दिलेला नाही. समीक्षक तरन आदर्श यांनी चित्रपटातील कालाकारांवर तोफ डागली आहे. ‘चमकणाऱ्या सर्व वस्तू सोनं नसतात’ अशा वाक्याने त्यांनी चित्रपटाविषयी ट्वीट केलं आहे. त्यांचे मत आहे की, चित्रपटाच्या एका तासात काही क्षण मोहित करणारे आहे. ठीकठाक असलेली पटकथा आणि वाईट दिग्दर्शन ही मुख्य कारणं चित्रपटाच्या अपयाशाला कारणीभूत ठरू शकतात.

  'काशीनाथ घाणेकर' ला मिळतेय प्रेक्षकांची पसंती
  एक नट घडायला आणि बिघडायला त्याच्या आजूबाजूची परिस्थिती कशी कारणीभूत ठरते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. काशीनाथ घाणेकर. या सिनेमातून डॉ.घाणेकरांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उत्तमरित्या रेखाटले आहेत. चित्रपट जरी सबकुछ सुबोध भावे असला तरी चित्रपटाचे श्रेय लेखक, दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांना जातं. काशीनाथ घाणेकर सिनेमाला या आमिर आणि अमिताभ यांच्या 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' तुलनेत जास्त पसंती मिळतेय शकते. कारण ‘…आणि डॉ.काशिनाथ घाणेकर’ सिनेमात

  कलाकारांपासून ते दिग्दर्शन फारचं छान असल्याचं म्हटलं जातयं.

  'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' वर सोशल मीडिया फनी कमेंट्स
  'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' सिनेमाने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली आहे. कारण हा सिनेमा रिलीज होण्यापुर्वीपासूनच याचा खुप गाजावाजा झाला होता. चित्रपट 300 कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. यामध्ये तडगी स्टारकास्ट, मोठ्या प्रमाणात प्रमोशन आणि बहुचर्चित सिनेमा असूनही हा प्रेक्षकांवर जादू दाखवू शकलेला नाही. आता प्रेकक्षकांनी यावर फनी प्रतिक्रिया देने सुरु केले आहे. सोशल मीडियावर अनेक फनी मिम्स व्हायरल होत आहे.

Trending