आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir Anantnag DC Office Terrorist Grenade Attack Updates: Terrorist Grenade Attack At Security Forces

अनंतनागमध्ये पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला, 13 जण गंभीर जख्मी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग येथे शनिवार सकाळी पोलिस उपायुक्त कार्यालयावर बॉम्ब हल्ला झाला. हल्लेखोरांनी कार्यालयास लक्ष्य करून ग्रेनेड बॉम्ब फेकले आणि पसार झाले. या हल्ल्यात कार्यालयातील 13 जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये पोलिस जवानांसह काही पत्रकारांचा देखील समावेश आहे. हल्ल्यानंतर परिसर सील करण्यात आले असून चोख सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोबतच, हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे.


जम्मू काश्मीरात कलम 370 रद्द करून दोन महिने उलटले आहे. तेव्हापासूनच काश्मीरात तणाव कायम आहे. अनेक ठिकाणी चोख सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या दोन वेग-वेगळ्या भागांमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यामध्ये 6 दहशतवाद्यांच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच एका जवानाला वीरमरण आले होते.