आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराने दहशतवाद्याच्या आईला दिलेला शब्द पाळला, जैश ए-मोहम्मदच्या सदस्याला जीवंत पकडले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याच्या आईला दिलेले आश्वासन पूर्ण करून माणुसकीचा नवीन आदर्श प्रस्तुत केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांनी एका दहशतवाद्याला जीवंत पकडले आहे. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली. सोहेल असे या दहशतवाद्याचे नाव असून गेल्या 4 महिन्यांपासून पोलिस आणि लष्कर त्याचा शोध घेत होते. विशेष म्हणजे, या दहशतवाद्याने अटकेच्या कारवाई दरम्यान फायरिंग सुद्धा केली होती. तरीही, सैनिकांनी सोहेलला ठार मारले नाही. कारण, त्यांनी सोहेलच्या आईला शब्द दिला होता. 


नुकताच बनला होता दहशतवादी, आईने दिली होती परतीची हाक...

- कर्नल एस राघव यांनी मंगळवारी जारी केलेल्या माहितीनुसार, "काश्मीरच्या करू येथे राहणारा सोहेल निसार लोन एक क दर्जाचा दहशतवादी होता. त्याला लष्कराने जिवंत पकडले आहे. सोहेल चार महिन्यांपूर्वी कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए मोहम्मदच्या संपर्कात आला. तेव्हापासूनच तो त्यांच्यासाठी काम करत होता. गेल्या चार महिन्यांपासून त्याची आई आणि बहिण त्याला परत येण्यासाठी आवाहन करत होत्या. आम्ही सोहलेच्या आईला शब्द दिला होता की त्याला ठार मारणार नाही, तर जीवंत पकडणार आहोत."
- लेफ्टनंट कर्नलने सांगितल्याप्रमाणे, एका महिन्यापासून लष्कराने त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. बिजनारी परिसरात त्याला घेराव घालण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच जैश-ए मोहम्मदचे काही ग्राउंड वर्कर पकडण्यात आले होते. त्यांच्याकडूनच पाकिस्तानी दहशतवाद्यांसह सोहेलचा ठाव-ठिकाणा लागला. सैनिकांच्या या विशेष तुकडीने सोहेलला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाली केले आहे. सोबतच सोहेल आणि इतर 3 दहशतवाद्यांकडून प्रत्येकी एक-एक एके-47 रायफल, 2 हातबॉम्ब, 1 पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूसा जप्त करण्यात आल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...