आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kashmir Had Lost Contact With The Country For 24 Hours.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरचा 24 तासांसाठी देशापासून संपर्क तुटला होता.. हिमालयामधील बर्फवृष्टीमुळे उत्तरेतील मैदानी भागांत झाली थंडीत वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- डोंगरी राज्यांत विशेषत: जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी व काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर तसेच मध्य क्षेत्रात पुन्हा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सर्वात जास्त बर्फवृष्टी काश्मीरमध्ये झाली. रस्ते वाहतूक तसेच विमान सेवा बंद झाल्याने काश्मीरचा उर्वरित देशाशी असलेला संपर्क चोविस तासांसाठी तुटला होता.

 

श्रीनगर-जम्मू राजमार्ग व मुगल रोड हिमवृष्टीमुळे बंद झाला होता. श्रीनगर - लेह राज्य महामार्ग व काही खिंडीतील मार्गही त्यामुळे बंद झाले होते. हिमवृष्टीमुळे शुक्रवार पासून शनिवारी दुपारपर्यंत श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे बंद झाले. त्यानंतर दोन उड्डाणे रद्द करण्यात आली होती. हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे सिमल्यासह अनेक भागातील वाहतूक ठप्प होती. काही भागात असंख्या वाहने अडकून पडली. 

 

श्रीनगरमध्ये २५.२ सेंमी., गुलमर्ग- ६० सेंमी हिमवृष्टी, नीटचे विद्यार्थी अडकले 
- श्रीनगरमध्ये चोवीस तासांत २५.२ सेंमी हिमवृष्टी झाली. प्रसिद्ध रिसोर्ट गुलमर्गमध्ये ६० सेंमी, काजीगुंड-२७ सेंमी, कोकेरनाग-७.५ सेंमी, पहलगाम ४० सेंमी, कुपवाडा येथे ४३ सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली. 
- गुलमर्गमध्ये तापमान उणे ७.३ अंश, लेहमध्ये उणे ८ अंश, कारगिलमध्ये उणे १५.६ अंश, जम्मू शहरात रात्रीचे किमान तापमान ८.६ अंश, कटरामध्ये ६.४ अंश सेल्सियस बटाेटेमध्ये शून्य ते उणे १.३ पेक्षा कमी तापमान होते. 
- बर्फवृष्टीमुळे पर्यटन क्षेत्रात नवीन आशा निर्माण झाली आहे. श्रीनगरमध्ये पर्यटकांचा मुक्काम वाढवला आहे. 
- श्रीनगरमध्ये नीटचे विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना रविवारी परिक्षेसाठी जम्मूत जायचे होते. 

 

राजस्थानसह दिल्लीत पाऊस शक्य 
पाच दिवसांनंतर राजस्थानसह एक डझन जिल्ह्यांत तापमान २ अंशापर्यंत घसरले आहे. बिकानेरसह ६ जिल्ह्यांत गाराही पडू शकतात. दिल्लीत सोमवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.

 

मध्य-प्रदेश, गुजरातेत आजपासून लाट 
डोंगराळ भागातील बर्फवृष्टीचा मध्य प्रदेश, गुजरातेत ४८ ते ७२तासांत परिणाम दिसून येतो. येथे ६ ते ९ जानेवारी पर्यंत थंडीची लाट आहे. गुजरातमध्येही अशीच स्थिती राहू शकते. 

 

हिमाचल प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी 
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात ९ जानेवारी पर्यंत बर्फवृष्टी सुरू राहील.हवामान विभागाने राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला. 

जगभर गारठा : थायलंडचे वादळ भारताकडे वळले, अमेरिकेत हिमवादळाची शक्यता 
- थायलंडमध्ये चक्रीवादळ पाबुकमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. हे वादळ आता अंदमान निकोबारपर्यंत पोहोचले आहे. 
- ब्रिटनच्या अनेक भागांत पारा उणे १० अंश सेल्सियस आहे. स्काॅटलँड गोठवणारी थंडी आहे. अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये १५ सेंटी मीटर बर्फवृष्टी झाली. टेक्सासमध्ये पारा शून्याखाली होता. ध्रुवाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी आणखी वाढू शकते. मिडवेस्टमध्ये सोमवारी हिमवादळाची शक्यता आहे.