आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir| Indian Army Killed Pakistani BAT Team Terrorists Trying To Infiltrate Through PoK

पाकच्या बॅट कमांडोंचा काश्मीरात घुसखोरीचा पुन्हा एकदा प्रयत्न; भारतीय सैन्याने पीओकेमध्ये बॉम्ब टाकून केला नाकाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून, पाकिस्तान आपल्या सैनिक आणि दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. बुधवारी लष्काराच्या सुत्रांनी सांगितले की, 12-13 सप्टेंबर रोजी पाकच्या बॅट (बॉर्डर अॅक्शन टीम)ने पीकेतून काश्मीरमध्ये घुसकोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र एलओसीवर तैनात भारतीय सैनिकांनी बॅरेल ग्रेनेड लॉन्चरने बॉम्बचे हल्ले करत त्यांना कंठस्नान घातले. 

न्यूज एजन्सीने सैन्या सुत्रांच्या हवाल्याने या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये भारतीय सैन्य दहशतवाद्यांवर बॉम्बचा मारा करताना पाहू शकतो. स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी)च्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी लष्काराने पीओकेच्या हाजीपीर भागात बॉम्बचा वर्षाव केला. 
 

 

मागील महिन्यात बॅट टीमच्या कमांडोना केले होते ठार 
भारतीय लष्कराने ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांच्या घुसकोरी करण्याच्या 15 प्रयत्नांना अयशस्वी केले आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या एका बॅट टीमने केरन भागात नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत 5 ते 7 दहशतवादी मारले गेले. यावेळी चार दहशतवाद्यांचे फोटो देखील जारी केले होते. 

दहशतवादी पीओकेमार्फत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात  
काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर जारी करण्यात आलेल्या गुप्त अहवालानुसार पीओकेमध्ये जैशच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे एसएसजी कमांडो फोर्स पूर्ण समर्थन करत आहेत. दहशतवादी आणि पाकिस्तानी सेना मिळून एलओसीवर घुसकोरी करण्यासाठी बीएटी ऑपरेशन राबवत आहे. जैश दहशतवादी काश्मीरमध्ये मोठे स्फोट घडवण्याचा कट रचत आहेत. यासाठी त्यांनी पीओके स्थित आपले अनेक ट्रेनिंग कॅम्प पुन्हा सक्रीय केले आहेत.