आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir Is The Matter Between India And Paksitan PM Modi In Trump Meet During G7 Summit

काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा! जी-7 संमेलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्टोक्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-7 संमेलनात सोमवारी स्पष्ट केले. जी-7 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीचे थेट प्रक्षेपण जगभरात करण्यात आले. मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेत काश्मीर हाच मुद्दा सर्वात महत्वाचा ठरला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मोदींनी प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच काश्मीरवर मध्यस्थी करू पाहणारे डोनाल्ड ट्रम्प यांनाही स्पष्ट शब्दांत भारताची भूमिका सांगितली. भारत आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय समस्यांमध्ये तिसऱ्याने हस्तक्षेप करण्याची गरज नाही असेही मोदी म्हणाले.

भारत-पाक चर्चेतून प्रश्न सोडवतील -ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील काश्मीर हा दोन देशांचा मुद्दा असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर भारत आणि पाकिस्तान चर्चेतून सर्व समस्यांचे समाधान काढतील असे ट्रम्प म्हणाले. केंद्र सरकारने काश्मीरात कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानातून जळफळाट व्यक्त केला जात आहे. सोबतच, पाकिस्तानचे नेते आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर बसून आणि ट्रम्प यांनी देखील काश्मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगत पाकिस्तानला दणका दिला.