आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kashmir Issue Will Not Be Discussed At Security Council, There Are Other Important Issues Around The World UN

सुरक्षा परिषदेत काश्मीर मुद्द्यावर चर्चा होणार नाही, जगभरात इतरही महत्वाचे मुद्दे आहेत- यूएन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनेव्हा- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शुक्रवारी स्पष्ट केले की, नोव्हेंबरमध्ये काश्मीर मुद्द्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. यूकेच्या स्थाई प्रतिनिधि आणि सिक्योरिटी काउंसिलच्या अध्यक्ष केरन पियर्सने स्पष्ट केले की, "सध्या जगभरात इतरही महत्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे सध्या काश्मीर मुद्याला शेड्यूल केले नाहीये."
प्रेसिडेंट पियर्स म्हणाल्या की, "अध्यक्ष जगभरात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांपैकी अशा मुद्द्यांना निवडतो, ज्यावर सुरक्षा परिषदेत आधी चर्चा झालेली नाहीये. आम्ही काश्मीरचा मुद्दा या कार्यक्रमादरम्यान शेड्यूल केला नाहीये. काही दिवसांपूर्वीच यावर चर्चा झालीये. तसेच सुरक्षा परिषदेतल्या इतर कोणत्याही सदस्याने याबाबत चर्चेची मागणी केली नाहीये.' 
दुसरीकडे भारताने याआधीच स्पष्ट केले आहे की, काश्मीरचा मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आहे. या प्रकरणात इतर कोणत्या देशाने मध्यस्थी करण्याची गरज नाहीये.

बातम्या आणखी आहेत...