आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर राजकीय समस्या, लष्करी उत्तर शाेधू नका; मेहबूबा यांचे मत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - पीपल्स डेमाेक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा तथा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर खाेऱ्यात अतिरिक्त सुरक्षा तुकडी तैनात करण्याच्या निर्णयाला विराेध दर्शवला आहे. काश्मीरची समस्या राजकीय आहे. त्यावरील ताेडगा लष्करी मार्गाने काढला जाऊ शकत नाही. 


केंद्र सरकारने राज्यात १० हजार अतिरिक्त पाेलिस दल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाेकांमध्ये आणखीनच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून तणावाची स्थिती आहे. केंद्राने आपल्या धाेरणावर नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. खाेऱ्यात १० हजार अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर फेरविचार व्हायला हवा, अशी मागणी मेहबूबा यांनी केली आहे. 


काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे काहीही काम नाही. जम्मू-काश्मीर राजकीय समस्या आहे. ती त्याच पद्धतीने साेडवली पाहिजे. सरकारने निमलष्करीच्या १०० तुकड्या, केंद्रीय राखीव पाेलिस दलाच्या ५० तुकड्या, ३० सशस्त्र सीमा दल व प्रत्येकी दहा सीमा सुरक्षा दलाचे सैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार दहशतवाद प्रतिबंधक पथक आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था करणे महत्त्वाचे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...