आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई. कॉमेडियन कृष्णा अभिनेकची पत्नी आणि अभिनेत्री करीश्मा शाह गुरुवारी आपल्या जुळ्या मुलांसोबत दिसली. करीश्मा मुलगा Ryan आणि Krishank ला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसली. यादरम्यान एका मुलाला तिने कडेवर घेतले होते तर दूस-याला केअरटेकर सांभाळत होती. करीश्मा मुलांसोबत यावेळी एकटीच होती. पती कृष्णा यावेळी नव्हता. कृष्णा आणि करीश्मा मे 2017 मध्ये जुळ्या मुलांचे पॅरेंट्स बनले आहेत. मुलांचा जन्म सरोगेसीच्या माध्यमातून झाला. कपल लवकरच एका मुलीला दत्तक घेणार आहेत. करीश्माने एका एन्टटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "आम्हाला खुप दिवसांपासून एक बेबी गर्ल हवी आहे आणि आता जुळ्या मुलांनंतर लवकरच घरात छोट्या परीची एंट्री करायची आहे."
14 वेळा अपयशी ठरली कश्मिराची प्रेग्नेंसी...
- मुलं आणि प्रेग्नेंसीविषयी बोलताना कश्मिरा म्हणाली, "फॅमिली प्लानिंगसाठी मी इंडस्ट्रीतील काम कमी केले होते. तीन वर्षे प्रेग्नेंसी राहावी यासाठी मी प्रयत्न करत होते, पण नेहमी अपयश पदरी पडले."
- "जेव्हा नैसर्गिकरित्या गर्भ राहात नाही, तेव्हा खूप अडचण येते. यामुळे माझ्या तब्येतीवर खूप परिणाम झाला होता. मी बाळासाठी IVF तंत्रज्ञानाची मदत घेतली होती."
- "तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तब्बल 14 वेळा माझा प्रेग्नेंसी अटेंप्ट अपयशी राहिला. यासाठी मी IVF इंजेक्शनचीही मदत घेतली होती. त्यामुळे माझे वजन खूप वाढले होते."
- "वजन वाढल्यानंतर ते कमी करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले होते. माझी कंबर 24 हून 32ची झाली होती. हा संपूर्ण काळ माझ्यासाठी अतिशय वेदनादायी होता. पण मी हार मानली नाही."
- "याकाळात वाढलेल्या वजनावरुन माझ्यावर लोकांनी टीका केली. लोक म्हणायचे, फिगरसाठी प्रेग्नेंट होत नाहीये, पण त्यांना सत्य कुठे ठाऊक होते. बाळासाठी मी शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले आहेत."
- "मी त्या सरोगेट मदरची कायम आभारी राहील. तिने माझ्या मुलांना जन्म दिला आणि एवढा त्रास सहन केला."
2005 मध्ये सुरू झाली होती कृष्णा-कश्मिराची लव्ह स्टोरी
बॉलिवूड स्टार गोविंदाचा भाचा असलेल्या कृष्णा अभिषेक आणि अॅक्ट्रेस कश्मिरा यांची लव्ह स्टोरी 2005 मध्ये सुरू झाली होती. दोघे 'और पप्पू पास हो गया' च्या शुटिंग दरम्यान जयपूरमध्ये भेटले होते. प्रोड्युसर ब्रॅड लिस्टरमॅनबरोबर लग्न झालेल्या कश्मिराने पाहताक्षणी प्रेमात पडल्याचे सांगितले होते. कश्मिराने 2007मध्ये ब्रॅड लिस्टरमॅनला घटस्फोट दिला होता.
नंतर झाले प्रेम
वन नाइट स्टँडपासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमाबाबत कृष्णाने एका मुलाखतीत सांगितले होते की, आमच्या प्रेमाची सुरुवात व्हॅनिटी व्हॅनमध्ये झाली होती. रात्र झाली होती आणि आम्ही व्हॅनमध्ये होते. त्याचवेळी मी विचारले की, 'आता काय करायचे', तेव्हा कश्मिरा म्हणाली होती, 'का काही करायचे आहे का?' अशाप्रकारे आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही तेव्हा सेक्स केला होता, असेही त्याने सांगितले होते. रिलेशनशिपबाबत तो म्हणाला, कश्मिरा सुरुवातीपासूनच त्याला हिंट देत होती. वन नाइट स्टँडनंतर ती जरा जास्तच केअरिंग झाली. माझ्यासाठी घरून जेवण तयार करून आणायची.
2013 मध्ये गुपचूप उरकले लग्न
अनेक वर्ष डेट केल्यानंतर आणि लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर कश्मिरा आणि कृष्णा यांनी 2013 मध्ये लग्न केले होते. हा समारंभ फार खासगी होता. 23 जुलैला कृष्णाने लग्नासाठी कश्मिराला प्रपोज केले आणि दुसऱ्या दिवशी दोघांनी लग्न केले.
10 गुलाब देऊन साजरी केली डेटींग अॅनिव्हर्सरी
10 जुलै 2015 ला कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह यांच्या डेटींगला 10 वर्षे झाली होती. त्यावेळी कश्मिराने दहा गुलाब देऊन कृष्णाला विश केले होते. दोघे एका रिअॅलिटी शोमध्ये कपल म्हणून सहभागीही झालेले आहेत.
कश्मिराने या चित्रपटांत केले आहे काम
2 डिसेंबर 1971 ला मुंबईत जन्मलेल्या कश्मिराने 1996 मध्ये एका तेलुगू चित्रपटात आयटम साँगद्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर तिने 'यस बॉस'मध्ये एक छोटी भूमिका केली. त्यानंतर प्यार तो होना ही था (1998), हिंदुस्तान की कसम, हेराफेरी (1999), आखे (2002), मर्डर (2004) आणि वेकअप सिड (2009) सारख्या चित्रपटांत काम केले. एफ यू आणि शिकारी या मराठी चित्रपटांमध्येही कश्मिरा झळकली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.