आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसशी संबंधीत काश्मिरी दांपत्याला अटक, पती हल्ल्याच्या तयारीत होता तर पत्नी मुस्लीम तरुणांना हल्ल्यासाठी तयार करायची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीतील जामिया नगरमधून जहांजेब सामी आणि हिंदा बशीर बेगला अटक करण्यात आली
  • जहांजेब फिदायीन हल्ल्याच्या तयारीत होता, पत्नी हिंदा बशीर हल्ल्यासाठी तरुण शोधत होती

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी आज(रविवार) इस्लामिक स्टेट खोरसान प्रॉविंस (आयएसकेपी) मॉड्यूलशी संबंधित काश्मिरी दांपत्याला अटक केली आहे. पोलिस आयुक्त प्रमोद सिंह कुशवाहा यांनी सांगितले की, जामिया नगरमधून जहांजेब सामी आणि हिंदा बशीर बेगला ताब्यात घेण्यात आले. दोघे सीएएविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा वापर मुस्लीम तरुणांची माथी भडकावने आणि त्यांना दहशतवादी हल्ल्यासाठी तयार करण्याचे काम करत होते. पोलिसांना त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि जिहादी कागदपत्रे मिळाली आहेत. हे दोघे अफगानिस्तानमध्ये आयएसकेपीच्या टॉप लीडर्सच्या संपर्काक होते.

जहांजेब अनेक दिवसांपासून इंटेलीजेंसच्या रडारवर होता


भारतीय गुप्तचर विभागाला जहांजेबचा दहशतवादी संघटना आयएसकेपीशी संबंध असल्याची माहिती मिळाली होती. आयएसकेपी अफगानिस्तानमध्ये आयएसआयएसची सहयोगी संघटना आहे. असा संशय होता की, जहांजेब फिदायीन हल्ला करण्याच्या तयारीत होता. यासाठी त्याने शस्त्रसाठा जमा करणे सुरू केले होते. सध्या त्याचे काम इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांचा प्रचार करण्यापर्यंतच होती. तो आयएसकेपीला जम्मू-काश्मीरबाहेर संपूर्ण देशात पोहचवण्याच्या तयारीत होता. 

पत्नीही दहशतवादी संघटनांच्या प्रचारात सामील होती

जहांजेब सामीची पत्नी हीना बशीर बेगदेखील सोशल मीडियावर आयएसचे समर्थन करणाऱ्या हँडलवर सक्रिय होती. ती दहशतवादी कारवायांसाठी तरुणांच्या शोधात होती. प्राथमिक चौकशीत जहांजेबने सांगितले की, ती आयएसची मॅगझीन स्वात-अल-हिंदच्या फेब्रुवारी महिन्यातील अंकाला प्रकाशित करण्यात सामील होता. यात सीएएचा विरोध करणाऱ्या लोकांना जिहादी मार्ग निवडण्याची अपील करण्यात आली होती. या मॅगझीनला 24 फेब्रुवारीला ऑनलाइन जारी करण्यात आले होते.