अॅक्टिंगनंतर चित्रपट निर्मितीमध्ये नशीब अजमावू इच्छिते कतरिना कैफ, एका चॅट शोमध्ये सांगितले कारण

'भारत'नंतर 'सूर्यवंशी'मध्ये दिसणार आहे कतरिना... 
 

दिव्य मराठी

Apr 28,2019 11:48:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : कतरिना कैफ आता फिल्म निर्माता बनू इच्छिते. तिने एक चॅट शो 'फीट अप विद द स्टार्स सीजन 2' मध्ये निर्माता बनण्याची इच्छा व्यक्त केली. शोच्या होस्टने जेव्हा तिला भविष्यातील काही प्लॅनिंगविषयी विचारले तेव्हा तिने याबद्दल सांगितले. कतरिनाचे म्हणणे आहे की, कंटेट डेव्हलप करण्याबद्दल ती नेहमी उत्साहित असते आणि त्यामुळे ती निर्माता बनू इच्छिते.

अनुष्का आणि दीपिकाला दिल्या शुभेच्छा...
कतरिनाने अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोणला स्वतःचे खाजगी प्रोडक्शन हाउस बनवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. अनुष्काने निर्माता म्हणून एन एच 10, परी आणि फिल्लौरी सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर दीपिका फिल्म 'छपाक' ची निर्मिती करत आहे.

'भारत'नंतर 'सूर्यवंशी'मध्ये दिसणार आहे कतरिना...
कतरिना, सलमान खान स्टारर फिल्म 'भारत' मध्ये दिसणार आहे. अली अब्बास जफर या फिल्मचे दिग्दर्शन करत आहे. ही फिल्म 2014 मध्ये आलेल्या साउथ कोरियन फिल्म 'ओड टू माई फादर' चे अधिकृत रूपांतरण आहे. फिल्म भारतमधील आपल्या भूमिकेबद्दल कतरिनाने इंस्टाग्रामवर लिहिले होते, 'या भूमिकेसाठी काम करताना मला खूप छान वाटले, हा पूर्ण प्रवास माझ्यासाठी खूप छान होता.... मी आतुरतेने याची वाट पहाटे आहे की, तुम्ही कधी हे पाहाल. या फिल्मनंतर कतरिना रोहित शेट्टीची फिल्म सूर्यवंशीमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्याअपोजिट अक्षय कुमार असणार आहे.

X