Home | Maharashtra | Vidarva | Akola | Katepurna dam filled up 9 2.35 percent

काटेपूर्णा धरण भरले ९२.३५ टक्के; साठवण क्षमतेच्या ७५ टक्के जलसाठा उपलब्ध

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 12:38 PM IST

जिल्ह्यातील जल प्रकल्पाच्या साठवण क्षमतेच्या ७५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात ४१ प्रकल्प मिळून ३५१.७७ दशलक्ष

  • Katepurna dam filled up 9 2.35 percent

    अकोला- जिल्ह्यातील जल प्रकल्पाच्या साठवण क्षमतेच्या ७५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात ४१ प्रकल्प मिळून ३५१.७७ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता आहे. तूर्तास २६०.८७ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ९२.३५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असला तरी अकोट तालुक्यातील तीन लघु प्रकल्पात अद्यापही जिवंत जलसाठा उपलब्ध झालेला नाही. परंतु यावर्षी मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने रब्बीच्या पेऱ्यात वाढ होणार आहे.


    जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम ३६ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांची तहान भागते तसेच जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. मागील दोन वर्षापासून पावसाच्या लहरीपणामुळे जल प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला नव्हता. परिणामी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हा वासीयांची तहान भागणार आहे तर दुसरीकडे सिंचन क्षेत्रातही वाढ होणार आहे.


    तीन लघु प्रकल्प ठरले अपवाद
    अकोट तालुक्यातील भिलखेड, धारुर, शहापूर बृहत या लघु प्रकल्पांची साठवण क्षमता अनुक्रमे ०.८४, ०.८५ आणि ६.३७ दलघमी आहे. मात्र या तिन्ही प्रकल्पात अद्याप जिवंत साठा उपलब्ध झालेला नाही.

Trending