Bollywood / कथक डान्सर-अभिनेता वीरू कृष्णन यांचे निधन, प्रियांकाने लिहिले - 'तुमची नेहमी आठवण येईल गुरुजी'

लारा म्हणाली ते एक उत्तम शिक्षक होते

Sep 08,2019 04:40:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : 90 च्या दशकातील 'राजा हिंदुस्‍तानी', 'इश्‍क', 'हम हैं राही प्‍यार के' आणि 'अकेले हम अकेले तुम' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले कथक डान्सर पंडित वीरू कृष्‍णन यांचे शनिवारी 7 सप्टेंबरला मुंबईमध्ये निधन झाले. वीरू यांच्या निधनाच्या बातमीने प्रियांका, लारा दत्ता, करणवीर बोहरा यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक शिष्यांनी त्यांना श्रद्धांजली दिली.

आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकलो - प्रियांका...
प्रियांका चोप्राने ट्वीट करून लिहिले, 'तुम्ही मला डान्स करायला शिकवले. कथकसाथीचे तुमचे धैर्य आणि पॅशनच होते ज्यामुळे आम्ही ना केवळ कथक शिकलो, तर आणखीही अनेक गोष्टी शिकलो. तुमची नेहमी आठवण येत राहील गुरुजी.'

लारा म्हणाली ते एक उत्तम शिक्षक होते...
लारा दत्तानेदेखील ट्वीट करून लिहिले, 'ही खूप वाईट बातमी आहे. माझ्या प्रार्थना आणि संवेदना गुरूजींच्या कुटुंबियांच्या सोबत आहेत. कथकसाठी त्यांचे पॅशन आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठीच्या त्यांच्या धैर्यानेच त्यांना एक उत्तम शिक्षक बनवले."

सहकलाकार होत्या नवनीत...
'राजा हिन्दुस्‍तानी' चित्रपटात त्यांच्यासोबत दिसलेली अभिनेत्री नवनीत निशानने लिहिले, 'माझे प्रिय वीरू कृष्‍णन, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो... माझा विश्‍वासच बसत नाहीये की, तुम्ही कायमचे आम्हाला सोडून गेलात. तुम्ही केवळ एक महान कथक डान्सरच नव्हते तर एक उत्तम कथाकार होते... मला तुमची नेहमी आठवण येईल मित्रा..'

X