आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Katrina And Shilpa Try To Impress Salman Khan With Their Dance, But Salman Reacted So Funny

सलमान खानला आपल्या डान्सने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होत्या कतरिना आणि शिल्पा, सलमानने दिली 'अशी' प्रतिक्रया 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कतरिना कैफ आणि शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी आणि कतरिना कैफ सलमान खानला आपल्या अदाकारीने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होत्या. या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ आपला चित्रपट 'भारत' चे सुपरहिट गाणे 'एत्थे आ' वर नाचताना दिसत आहेत. मात्र त्यांचा डान्स पाहून सलमान खान झोपण्याचा अभिनय करतो आणि झोपेतून उठल्यावर म्हणतो, 'बकवास, बकवास डान्स केला, सर्वांना झोपवले.' त्यामुळे स्टेजवरील सर्वचजण खूप हसू लागतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ टेलिव्हिजनचा डान्स रियलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर 3' चा आहे. तसा तर हा व्हिडीओ जुना आहे, पण सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि कतरिना कैफच्या डान्सच्या या व्हिडीओने खूप धम्माल केली आहे.