Health / जाणून घ्या, कॅटरिनाचे फिटनेस सिक्रेट, कोणत्या आहारामुळे दिसते एवढी सुंदर

आज 16 जुलैला कॅटरिनाचा वाढदिवस आहे. फिटनेसबाबत सजग असणारी कॅटरिना स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करते. यासोबत ती पौष्टिक आहारामुळे इतकी सुंदर दिसते. 

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 12:05:00 AM IST

आज 16 जुलैला कॅटरिनाचा वाढदिवस आहे. फिटनेसबाबत सजग असणारी कॅटरिना स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करते. यासोबत ती पौष्टिक आहारामुळे इतकी सुंदर दिसते.


तिचा वर्कआउट
कॅटरिना नियमितपणे कोर आणि एब्सचा व्यायाम करते. यात जिमिंग, जॉगिंग, आयसोप्लेक्सचा समावेश आहे.


ती रोज योगा करते. यामुळे तिच्या शरीराला आकार मिळतो. तणाव दूर करण्यासाठी खूप मदत होते.

ती फंक्शनल सर्किट ट्रेनिंग करते. यामुळे स्नायूंना अाकार मिळतो. यामुळे शरीराच्या सर्व अंगांना फायदा होतो.


कॅटरिना स्क्वाट, लंजेस आणि पुशअप्स करते जेणेकरून शरीर मजबूत राहील. यामुळे शरीराचे संतुलन चांगले राहाते.

ती पिलाटे करते. यामुळे शरीराची ताकद आिण लवचिकता वाढते. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास लाभदायी आहे.


तिचा आहार
नाष्टा :

- सकाळी उठल्यावर ती प्रथम पाणी पिते. ती ओटमिल, अंड्ड्याचा पांढरा भाग आणि डाळिंबाचा ज्यूस घेते.
दुपारचे जेवण : भातासह वरण, भाजी आिण ग्रीन सलाद घेते. एका दिवसाआड ती बटर सोबत ब्राउन ब्रेड आणि ग्रिल्ड फिश खाते.
- जेवण उकळलेल्या भाज्या, पोळी, ग्रीन सलाद आिण भाज्यांचे सूप याचा तिच्या जेवणात समावेश असतो.
ईव्हनिंग स्नॅक्स
ब्राउन ब्रेड सोबत पीनट बटर खायला तिला आवडते.

X
COMMENT