आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईमध्ये कतरिनाच्या फक्त एका बंगल्याची किंमत आहे 31 कोटी, याच शहरात आहेत तिचे अजून 2 घरं, लंडनमध्येही बंगला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. 2018 च्या Forbes India Celebrity 100 लिस्ट आली आहे. यामध्ये कतरिना कैफ 21 व्या स्थानी आहे. तिची वार्षिक कमाई 33.67 कोटी आहे. विशेष म्हणजे कतरिनाने यावर्षी करीनापेक्षा जास्त पैसे कमावले आहे. कतरिना यावर्षी लिस्टमध्ये 25 व्या स्थानी आहे, तिने फक्त 31 कोटींची कमाई केली आहे. कतरिना कैफ लग्जरी आयुष्य जगणे पसंत करते. 
आज आम्ही तुम्हाला कतरिनाच्या महागड्या वस्तूंविषयी सांगत आहोत.


मुंबईमध्ये घर 
कतरिनाजवळ बांद्रा, मुंबईमध्ये एक अपार्टमेंट आहे. याची किंमत 8.2 कोटी आहे. यासोबतच तिच्याजवळ लोखंडवालामध्ये एक अपार्टमेंट आहे. याची किंमत जवळपास 17 कोटी आहे. बांद्रामध्ये तिच्याजवळ एक सी-फेसिंग पेंटहाउस आहे. याची किंमत जवळपास 31 कोटी आहे. 

 

लंडनमध्ये बंगला 
कतरिनाचे कुटूंब लंडनमध्ये राहते. तिथे तिच्या कुटूंबाचे घर आहे. तरीही लंडनमध्येही कतरिनाने एक बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 7. 02 कोटी आहे. 

 

कार कलेक्शन 
कतरिनाच्या कलेक्शनमध्ये अनेक लग्जरी कार आहेत. तिच्याजवळ 42 लाखांची ऑडी क्यू 3 आहे. यासोबतच मर्सिडीज एमएल 350(50 लाख रुपये), ऑडी क्यू (80 लाख रुपये) कार आहेत.
- कतरिनाच्या हँडबॅग्जही खुप क्रेजी आहेत. तिच्याजवळ Balenciaga ब्रांडच्या हँडबॅग्ज आहेत. या ब्रांडच्या बॅग्जची किंमत 1.50 पासून ते 2 लाखांपर्यंत असते.

 

15 वर्षांपासून चित्रपट करिअरमध्ये 33 चित्रपट 
कतरिनाने 2003 मध्ये 'बूम' चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती तिने आपल्या 15 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 33 चित्रपटांमध्ये काम केले. तिने 'मैंने प्यार क्यों किया', 'नमस्ते लंदन', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'राजनीति', 'जिंदगी न मिलेंगी दोबारा', 'एक था टाइगर', 'धूम 3', 'टाइगर जिंदा है' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 'झिरो' हा तिचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात ती शाहरुख खान आणि अनुष्का शर्मासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. यासोबतच सलमान खानसोबत 'भारत' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु आहे. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज होईल. 


कतरिनाची विचित्र सवय 
'कॉफी विद करण' सीजन 6 मध्ये कतरिना गेल्या महिन्यात वरुण धवनसोबत या शोमध्ये सहभागी झाली होती. शोमध्ये कतरिनाच्या मैत्रिणीने तिची एक विचित्र सवय सांगितली होती. फ्रेंडने सांगितले की, कतरिनाला जी वस्तू आवडते, ती वस्तू ती उचलून घेऊन येते. यास्मीन कराचीवालाने सांगितले की, कतरिना तिचे वर्कआउट ड्रेसेस घेऊन गेली होती. तर वरुणने सांगितले होते की, ती त्याचा चश्मा घेऊन गेली होती. पण यावर कतरिना म्हणाली की, मी विचारुन घेऊन जाते.
 

 

बातम्या आणखी आहेत...