आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Katrina Kaif Has Now Been Approached For The Remake Of 'Satte Pe Satta', Hrithik Roshan Will Play Double Role

'सत्ते पे सत्ता' च्या रिमेकसाठी आता कतरिनाला केले गेले अप्रोच, डबल रोलमध्ये दिसणार आहे ऋतिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : फराह खान आणि रोहित शेट्‌टी अलीकडे 'सत्ते पे सत्ता' च्या रिमेकवर काम करत आहे. चित्रपटातील पात्रांची अद्याप निवड झालेली नाही. पण या चित्रपटात ऋतिक रोशन काम करेल, अशी चर्चा आहे. तो यात दुहेरी भूमिकेत दिसेल. मूळ चित्रपटात ही भूमिका अमिताभ बच्चनने केली होती. आता तर हेही कानावर आले आहे की, ऋतिकबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून यात कतरिना कैफला घेतले जाणार आहे. कतरिना या चित्रपटात हेमा मालिनीने केलेली भूमिका साकारणार आहे. 

 

निवडीला लागेल वेळ...  
या चित्रपटात अनेकांच्या भूमिका असतील. त्यामुळे निर्माते या चित्रपटाबाबत खूप बारिकीने काम करत आहेत. त्यामुळे भूमिकांची निवड करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.' सध्या तर फक्त कलावंतांशी बोलचाली होत आहेत. त्याबाबतही लवकरच घोषणा केली जाईल. 

 

- 1982 प्रदर्शित झाला होता मूळ चित्रपट 
- 07 भावांभोवती फिरते या चित्रपटाची कथा 
- 02 चित्रपटात एकत्र दिसले ऋतिक-कॅटरिना 
- ऋतिक यापूर्वी 'कहो ना प्यार है' व 'क्रिश' मध्येही दुहेरी भूमिकेत दिसला होता. 

 

शाहरुख-दीपिकाची चर्चा...  
या चित्रपटातील कलावंतांच्या निवडीवरून बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. याआधी हेही कानावर आले होते की या चित्रपटात फराह, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणला घेऊ इच्छितात. पण अजूनपर्यंत त्याबाबत काही निर्णय झालेला नाही. 

 

उत्साहात आहे कॅटरिना...  
निर्माते या चित्रपटासाठी अनेक अ दर्जाच्या अभिनेत्रींशी बोलत आहेत. जेव्हा त्यांनी ऋतिकला घेण्याचा विचार केला तेव्हा त्याने कॅटरिनाच्या नावावर सर्वप्रथम चर्चा केली. यापूर्वी या दोघांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. या चित्रपटासाठी तिचा विचार केला जात असल्याने कॅटरिनाला सन्मानजनक वाटत आहे.