Home | News | Katrina Kaif literally cried to bag the role played by Anushka Sharma

अनुष्काची भूमिका मिळवण्यासाठी रडली होती कतरिना कैफ, आनंद एल राय म्हणाले - 'हो, हे खरे आहे'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

मला बबिताची भूमिका आवडते, पण आफियाच्या भूमिकेवर मी प्रेम करते.

 • Katrina Kaif literally cried to bag the role played by Anushka Sharma

  बॉलिवूड डेस्क. 'झिरो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनुष्का शर्माची प्रचंड स्तुती केली जात आहे. अनेक प्रेक्षकांनी तिची भूमिका शाहरुखपेक्षाही जास्त भावली आहे. कतरिना कैफला या गोष्टींचा सुरुवातीलाच अंदाजा होता. यामुळेच ती अनुष्काची भूमिका तिला मिळावी यासाठी डायरेक्टरकडे याचना करत होती. स्वतः कतरिनाने रेड चिलीज एन्टटेन्मेंटचे स्पेशल सेगमेंट 'झीरो का सच'मध्ये हा खुलासा केला आहे.

  बोलताना इमोशनल झाली कतरिना
  शाहरुखला बबिता4 कुमारी(कतरिना कैफ) ची भूमिका पसंत आहे, ती एक व्यसनी अभिनेत्री आहे. अनुष्काला बउसा सिंह (शाहरुख खान)ची भूमिका पसंत आहे. तो मोठे मोठे स्वप्न पाहणारा मेरठचा एक ठेंगणा व्यक्ती आहे. तर कतरिनाने स्क्रिप्ट पाहिल्यानंतर तिला आफिया युसुफजई भिंडेर (अनुष्का शर्मा)ची भूमिका करायची होती. पण तिला ती भूमिका मिळाली नाही.

  डायरेक्टरनेही केले मान्य
  शाहरुखने कतरिनाची टांग ओढत म्हणाला की, तिला स्वतःची भूमिका आवडली नाही का? यावर कतरिना म्हणाली - मला बबिताची भूमिका आवडते, पण आफियाच्या भूमिकेवर मी प्रेम करते. हे बोलता बोलता कतरिना इमोशनल झाली आणि म्हणाली की, या भूमिकेसाठी मी डायरेक्टर आनंद एल रायसमोर रडले होते. आनंदनेही याचे स्पष्टीकरण दिले की, हो कतरिनाला आफियाची भूमिका करायची होती.

Trending