आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस 13' मध्ये सलमान खानसोबत शो को-होस्ट करू शकते कतरिना कैफ किंवा आलिया भट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : सलमान खान आणि कतरिना कैफ सध्या आपला अपकमिंग चित्रपट 'भारत'च्या प्रमोशनमध्ये वयात आहेत. हा चित्रपट 5 जून म्हणजेच ईदला रिलीज होणार आहेत. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलरमध्ये सलमान-कतरिना यांच्या जोडीला पसंत केले जाते. तशीही ही जोडी जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येते तेव्हा ती चर्चेचा विषय बनते. त्यामुळे आता मोठ्या पडद्यासोबतच त्यांना छोट्या पडद्यावरही एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

 

बिग बॉस 13 ला को-होस्ट करू शकते कतरिना... 
रिपोर्ट्सनुसार, कतरिना, सलमान खानसोबत 'बिग बॉस 13' ची को-होस्ट होऊ शकते. शोच्या मेकर्सला सलमानने ही आइडिया दिली आहे की, यावेळी शो होस्ट करण्यासाठी त्याच्यासोबत एका फीमेल होस्टला देखील आणले पाहिजे. यामुळे शोमध्ये फ्रेशनेस येईल. 

 

आलियाच्या नावाचाही केला जात आहे विचार... 
कतरिनाव्यतिरिक्त मेकर्स आलिया भट्टच्या नावाचाही विचार करत आहेत. जिच्यासोबत सलमान, संजय लीला भन्साळीचा आगामी चित्रपट 'इंशाअल्लाह'मध्ये काम करणार आहे. मात्र चॅनलकडून अद्याप काही ऑफिशियल कंफर्मेशन मिळाले नाही की, शोमध्ये एखादी फीमेल को-होस्ट असेल की, नाही. हा शो सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...