आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Katrina Kaif Rehearsal On Suraiya Song Video: Katrina Learn Dance To Prabhu Deva And Share Moments Of Tears In Video

कतरिना कैफने आयटम नंबरसाठी तासंतास गाळला घाम, प्रभुदेवाने एवढा वेळा करुन घेतली प्रॅक्टिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 'ठग्स ऑफ हिंदोस्तां'मध्ये कतरिना कैफ लवकरच 'सुरैया' हा आयटम साँग करताना दिसणार आहे. कतरिनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका गाण्यासाठी तासंतास प्रॅक्टिस करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये कतरिना 'सुरैया' गाण्याच्या रिहर्सलमध्ये प्रचंड प्रॅक्टिस करताना दिसतेय. या गाण्यात प्रभुदेवाने कतरिनासाठी कोरियोग्राफ केले आहे. कतरिनाने प्रभुदेवाकडून डान्सचे बारकावे शिकले. कतरिना सांगते की, "प्रभुदेवाने माझ्यासोबत रिहर्सलमध्ये खुप वेळ घालवला. मला फिंगर स्टाइल विषयी गाइड केले. मला खुप मजा आली. काही स्टेप अशा होत्या ज्यामध्ये रडायला येत होते. पण गाण्यातील हुक स्टेप खुप मजेदार आहे." कतरिना या गाण्यासाठी किती मेहनत करतेय हे या गाण्यात स्पष्ट दिसत आहे. चित्रपटात कतरिनासोबतच आमिर खान, अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट याच वर्षी 8 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...