आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाची ईयरिंग्स तर कुणाचा चश्मा, मित्रांच्या घरुन वस्तू उचलून आणते कतरिना, मैत्रिणीने केली पोलखोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. 'कॉफी विद करण' सीजन 6 मध्ये यावेळी कतरिना कैफ आणि वरुण धवन हजर होते. शोमध्ये दोघांच्या पर्नसल आयुष्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या. एवढेच नाही तर कतरिनाच्या फ्रेंड्सने यासंबंधीत अनेक रहस्यही उघडले. तिने सांगितले की, तिला जे काही आवडते ती ते घरी घेऊन जाते. 


स्वतःवर लावलेल्या आरोपांवर कतरिनाने दिले उत्तर 
- कतरिनाची मैत्रिण मिनी माथुर आणि यास्मीन कराचीवालाने तिचे अनेक रहस्य उघडल केले तेव्हा शोमध्ये मजेदार वळण आले. मिने सांगितले की, अनेक वस्तूंसोबतच कतरिना तिच्या ईयरिंग्सही घेऊन गेली. 
- तर यास्मीनकडून तिचे वर्कआउट ड्रेसेसही ती घेऊन आली. एवढेच नाही तर वरुण म्हणाला की, ती त्याचा चश्माही घेऊन गेली. सर्वांचे ऐकल्यानंतर कतरिनाने उत्तर दिले की, 'मी फ्रेंड्सला विचारुन त्यांच्या वस्तू आणते.'

 

आलिया-रणबीरच्या रिलेशनशिपविषयी कतरिनाची रिअॅक्शन 
कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सध्या आलिया भटला डेट करतोय. दोघांच्या रिलेशनशिपविषयी कतरिनाला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, 'दोघांचे नाते स्विकारण्यात मला काहीच त्रास झाला नाही. आलियासोबतच्या रिलेशनविषयी  ती म्हणाली की, मी तिच्यासोबत कम्फर्टेबल आहे. एवढेच नाही तर तिने रणबीरची एक्स दीपिकाविषयीच्या प्रश्नाचे उत्तरही दिले. ती म्हणाली की, माझी केमिस्ट्री रणबीर, आलिया आणि दीपिकासोबत पर्सनली वेगवेगळी आहे.'
- करणनने विचारले की, चाहत्यांना वाटते की, तु सलमानसोबत लग्न करुन घ्यावे. यावर कतरिना म्हणाली की, सर्व लोक असे विचार करतात कारण, आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि आम्ही अजूनही सिंगल आहोत.


नात्यांविषयी बोलली कतरिना 
कतरिनाने शोमध्ये नात्यांविषयी बातचित केली. ती म्हणाली की, एका महिलेसाठी एक पुरुष असणे खुप गरजेचे आहे असे मानले जाते. पण हे सर्वांसाठी सत्य नसू शकते. तिला वाटते की, लोक आपल्या पार्टनरवर स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी देतात. याच कारणांमुळे नात्यात अडचणी निर्माण होतात. तिने सांगितले की, आपण नेहमी तुलना करतो की, आपला पार्टनर आपल्याला किती प्रेम आणि अटेंशन देतो. यामुळे रिलेशनशिपवर परिणाम होत नाही, पण सेल्फ रिस्पेक्टला ठेच पोहोचते आणि इमेज खराब होते.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...