आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रेकअप माझ्यासाठी वरदान ठरले', रणबीर कपूरपासून वेगळी झाल्यानंतर कतरिनाने केला मोठा खुलासा, पण सत्य काही वेगळेच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. कतरिना कैफ म्हणतेय की, ब्रेकअप माझ्यासाठी वरदान ठरले आहे. एका ग्लॅमर मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हे स्टेटमेंट दिले आहे. कतरिनाने यावेळी कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण तिने रणबीर कपूरकडे इशारा केला असे मानले जातेय. 2009 मध्ये 'अजब प्रेम की गजब कहानी' मधून रणबीर कतरिनाचे अफेअर सुरु झाले. पण 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. 

 

मॅग्झिनमध्ये ब्रेकअपविषयी काय बोलली कतरिना 
- कतरिना ब्रेकअपविषयी म्हणाली की, "आता मी याला वरदान समजते. कारण मी माझे पॅटर्न आणि थॉट प्रोसस ओळण्यास सक्षम बनले. मी त्यांना वेगळ्या नजरेने पाहू शकते." कतरिनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर आता आलिया भटला डेट करतोय. पण अजून रणबीर आणि आलियाने याची पुष्टी केलेली नाही. 

 

कतरिना आयुष्यात आली तेव्हा दीपिकाला डेट करत होता रणबीर 
- दीपिका पदुकोणने रणबीर कपूरसोबत कतरिनाची ओळख करुन दिली होती. त्यावेळी कतरिना कैफ दीपिकाची चांगली मैत्रिण होती आणि रणबीर दीपिकाचा बॉयफ्रेंड होता. पण नंतर रणबीरने दीपिकाला धोका दिला आणि कतरिना कैफला डेट करायला सुरुवात केली. यामुळे दीपिका आणि रणबीरमध्ये दिर्घकाळ वाद होता. पण आता कतरिना रणबीरपासून वेगळी झाली आहे आणि दीपिकाचे लग्न रणवीरसोबत झाले आहे. मुंबईमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या रिसेप्शन पार्टीमध्ये कतरिना कैफ हजर होती. तर रणबीर दीपिकाचा चांगला मित्र असूनही रिसेप्शनमधून गायब होता. तर त्याची गर्लफ्रेंड आलियानेही रिसेप्शनला दांडी मारली होती. 

 

रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती आलिया 
आज कतरिना म्हणतेय की, ब्रेकअप तिच्यासाठी वरदान ठरले आहे. पण रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाचे जवळचे लोग म्हणाले होते की, "आठ तासांची झोप पुरेसी असते. काही लोक 10 तास झोपतात. पण कतरिनाची 13-13 तासांची झोप आर्श्चर्यकारक आहे." रिपोर्ट्सनुसार, मनोवैज्ञानिक याला पोस्ट ब्रेकअप इफेक्ट म्हणाले होते. यामध्ये व्यक्ती आपल्याच विचारांपासून दूर पळतो तेव्हा गरजेपेक्षा जास्त झोपतो. ब्रेकअपच्या एक वर्षांनंतर 2015 मध्ये कतरिना म्हणाली होती की, "माझे शेड्यूल खुप व्यस्त आहे म्हणून माझी जास्त वेळ झोप होत नाही." तिची फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला अनेक वेळा रात्री 2-3 वाजता तिला ट्रेनिंग देण्यासाठी पोहोचायची. कैटरिना म्हणाली होती की, मी झोप सोडू शकते पण फिटनेस रुटीन सोडू शकत नाही. 2016 मध्ये रणबीर कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर स्वतः कतरिनाने 13-13 तास झोप घेत असल्याचे स्विकारले होते. कतरिना स्वतःला स्लीपोहॉलिक म्हणत होती पण ती डिप्रेशनमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...