आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कतरिना कैफने शेअर केला पोलिसांच्या वर्दीचा फोटो, 'सूर्यवंशी' चित्रपटाची झलक असल्याची चर्चा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या आगामी प्रोजेक्ट 'सूर्यवंशी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सांगितले जात आहे की, चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे आणि चित्रपटाच्या सेटवरून एक फोटोसमोर आला आहे. ज्यावरून अनेक प्रकारचे अंदाज वर्तवले जात आहे. कतरिनाने आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पोलिसांची वर्दी दिसत आहे आणि त्यावर नेम प्लेट लागलेली आहे. कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोवरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा फोटो सूर्यवंशी चित्रपटाशी संबंधित आहे. या फोटोमधील वर्दीवर, 'वीर सूर्यवंशी' हे नाव लिहिलेले दिसत आहे. त्यावरून हादेखील अंदाज वर्तवला जात आहे की, या चित्रपटात अक्षय कुमारचे नाव वीर सूर्यवंशी आहे, कारण चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. 

त्यासोबतच हेदेखील कळाले आहे की, चित्रपटात अजय देवगन आणि रणवीर सिंहदेखील दिसणार आहेत, यांचा चित्रपटात गेस्ट अपरांस असू शकतो. हा रोहित शेट्टीचा पोलिस बेस्ड ड्रामा कॅटॅगरीमधील चौथा चित्रपट आहे. यापूर्वी 'सिंघम', 'सिंघम-2', 'सिंबा' रिलीज झाल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...