आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठग्ज ऑफ हिन्दोस्तान : सुरैया गाण्याचे टीजर रिलीज, कतरिनाने केला सिजलिंग डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. ठग्ज ऑफ हिन्दोस्तान चित्रपटाचे सुरैया जान लेगी क्या या गाण्याचे टीजर रिलीज झाले आहे. यामध्ये कतरिना कैफ सिझलिंग डान्स करताना दिसत आहे. हे गाणे विशाल ददलानी आणि श्रेया घोषालने गायले आहे. या गाण्याचे फुल व्हर्जन केवळ थिएटर्समध्ये पाहायला मिळेल असे या गाण्याच्या अखेरीस लिहिलेले आहे. 

 

थिएटरमध्ये दिसेल फुल व्हर्जन 
सुरैया गाण्याच्या टीजरमध्ये आमिर खानही कतरिनासोबत ठुमके लावताना दिसतोय. आमिर चित्रपटात फिरंगी भूमिकेत दिसणार आहे. ठग्ज ऑफ हिन्दोस्तान चित्रपटासाठी प्रभुदेवाने कोरियाग्राफी केली आहे. यापुर्वी आलेल्या वश्मल्ले गाण्यात अमिताभ आणि आमिर डान्स करताना दिसले होते. 

 

तिन्ही कलाकारांनी घेतली ट्रेनिंग 

सुरैया जान गाणे हे कतरिनाचे सोलो ट्रॅक आहे, परंतु आमिर आणि फातिमासोबतही तिचा डान्स नंबर चित्रीत करण्यात आला आहे. चित्रपटात हे गाणे शूट करण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली. यासाठी तिन्हीही कलाकारांना ट्रेनिंग घ्यावी लागली. या प्रकारचा ट्राइबल डान्स यापुर्वी कोणत्याही चित्रपटात पाहायला मिळालेला नाही. हे जंगल साँग चित्रपटातील मेज टर्निंग पॉइंट आहे. हे गाणे चित्रपटाच्या थीमला सूट होते. कारण कथा 18 व्या शतकात सेट करण्यात आली आहे. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...