आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Katy Perry's 3 year old Photo Raises Trouble, Resulting In A $ 1.5 Million Lawsuit

​​​​​​​केटी पेरीचा 3 वर्षे जुन्या फोटोने वाढला त्रास, झाला 1.5 लाख डॉलरचा खटला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : तीन वर्षे जुना एक फोटो शेअरिंगचे प्रकरण केटी पेरीसाठी संकट बनले आहे. झाले असे की, 2016 मध्ये झालेल्या एका हॅलोवीन पार्टीमध्ये केटी, हिलेरी क्लिंटन यांच्यासारखे ड्रेसअप होऊन पोहोचली होती. हा फोटो शेअर केल्यामुळे केटीविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाअंतर्गत 1.5 लाख डॉलरचा खटला दाखल झाला आहे. 

बॅकग्रीडने केली केस... 
फोटोवर सेलेब्रिटी न्यूज एजन्सी बॅकग्रीडने यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट कॅलिफोर्नियामध्ये खटला दाखल केला आहे. केटी पेरीच्या इंस्टाग्रामवर 86.2 मिलियन फालोअर्स आहेत. बॅकग्रीडने दावा केला आहे की, पेरीने खाजगी पेजवर एजन्सीला कॉपीराइट केला गेलेला फोटो पोस्ट करून अमेरिकेच्या संघीय कायद्याचे उल्लंघन केले. एजन्सी हेदेखील म्हणाली की, जर तिला या फोटोचा उपयोग करायचा असेल तर तिला आधी लायससिंग फीस भरावी लागेल. तसे न केल्यामुळेच तिच्यावर खटला दाखल केला गेला आहे.  

केटीच्या इंस्टाग्रामवर अजूनही आहे तो फोटो... 
हा फोटो केटीने 29 ऑक्टोबर 2016 ला शेअर केला होता. जो अजूनही तिच्या पेजवर आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, 'ऑफिसला जाण्यापूर्वी एक छोटीशी प्री पार्टी, मी आणि माझ्यासोबत. चीअर्स. केटीसोबत ऑरलँडो ब्लूमदेखील दिसले होते. जे डोनाल्ड ट्रम्पसारखे तयार होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये केटीने लिहिले होते - 'बिल आणि त्यांचा 4EVA'