आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्तीची प्रक्रिया अपूर्णच : कौतिकराव ठाले पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षाची निवड बिनविराेध करण्याबाबत मागील बैठकीत घटनेत दुरुस्ती केली अाहे. ही प्रक्रिया अाता पूर्ण झाल्यामुळे यंदा यवतमाळमध्ये हाेणाऱ्या साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी निवडणूक हाेणार नाही, अशी घाेषणा महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जाेशी यांनी मंगळवारी नागपुरात केली. या संदर्भात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ‘घटना दुरुस्तीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही,’ असा दावा त्यांनी केला.  


जाेशी म्हणाले, ‘महामंडळाच्या घटनेतील कलम १५ (१) नुसार महामंडळाच्या विशेष सभेत सर्व दहाही घटक संस्थांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी असतात. त्यानुसार जूनमध्ये नागपूर येथे घटना दुरुस्तीसाठी झालेल्या विशेष सभेत सर्व घटक संस्थांच्या प्रतिनिधींनी दुरुस्ती मसुद्याला मान्यता दिली होती. त्यामुळे आता कोणाच्याही अाक्षेपाला अर्थ राहत नाही. घटना दुरुस्तीची प्रक्रिया पूर्णपणे कायदेसंमत अाहे.’  घटनेच्या कलम १५ (२) नुसार प्रस्ताव मंजुरीसाठी सर्व घटक संस्थांकडे पाठविण्यात आला. त्यावर कोणीही आक्षेप नोंदवले नाही. त्यानंतर सर्व घटक संस्थांना रीतसर २८ आॅक्टोबर रोजी यवतमाळ येथे आयोजित बैठकीत अध्यक्षपदासाठी  नावे पाठविण्यासाठी दोन पानांचे पत्र पाठविण्यात आले. त्यालाही कोणी आक्षेप घेतला नाही’, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...