अनुच्छेद ३७० / काश्मिरी महिला कधीही डगमगल्या नाहीत

अनुच्छेद ३७० आणि ३५-अ हटवल्यानंतर काही पुरुषांना असे वाटते आहे की, आता त्यांना काश्मिरी महिलांशी विवाहबद्ध हाेण्यास परवानगी मिळाली आहे.

दिव्य मराठी

Aug 17,2019 09:32:00 AM IST

अनुच्छेद ३७० आणि ३५-अ हटवल्यानंतर काही पुरुषांना असे वाटते आहे की, आता त्यांना काश्मिरी महिलांशी विवाहबद्ध हाेण्यास परवानगी मिळाली आहे. याचसाेबत दुसरा विचार जाे लाेकांच्या मनात आला, ताे हा हाेता की देशभरातील लाेक आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकतील. ही युद्धाची खुमखुमी आहे, ज्याचा उपयाेग बऱ्याच काही लाेकांनी केला आणि हे सारे लाेक अशा वर्गातील हाेते, ज्यांनी काश्मीरला हा एका निरंतर विचाराच्या रूपात नव्हे तर, चित्रलेखा झुत्सी यांनी म्हटल्याप्रमाणे या लाेकांनी भाैगाेलिक परिसराच्या रूपात पाहिले आहे. कलम ३५-अ मुळे महिलांशी माेठ्या प्रमाणावर भेदभाव हाेत असे, त्यामुळे हे कलम हटवल्यामुळे बराच जल्लाेष साजरा करण्यात आला. यामुळे जर महिलेने अन्य राज्यातील पुरुषाशी विवाह केला तर संबंधित महिलेसह पती आणि मुलांचा पूर्वजांच्या संपत्तीवर काेणता अधिकार नसायचा. तथापि, २००२ मध्ये जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने या कलमात परिवर्तन करीत हे स्पष्ट केले की, जर महिलेने अन्य काेणत्या राज्यातील पुरुषाशी विवाह केला असेल तरीही या प्रांताची कायमस्वरूपी नागरिक राहील. परंतु तिच्या मुलांना ताे अधिकार दिला गेला नाही. किंबहुना त्याविषयी भूमिका स्पष्ट केली नाही.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लिंगभेदाची भावना कायम राहिली. जम्मू-काश्मीर विधानसभेने दाेन वेळा कायद्याचा मसुदा तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु ताे असफल ठरला.


लेखक मनू खजूरिया यांनी म्हटले की, कलम ३५-अ, १९२७ च्या आेरिजिनल स्टेट सब्जेक्ट लाॅपेक्षा भिन्न आहे, आणि १९५४ च्या जम्मू-काश्मीर संविधान सभेच्या सत्रांमध्ये त्यास सामील करण्यात आले हाेते. २५ मार्च १९६९ राेजी ते अमलात आले. तत्कालीन काश्मिरी सरकारद्वारे सर्व महसूल अधिकाऱ्यांना आणि जिल्हा आयुक्तांना जम्मू-काश्मीरच्या महिलांच्या राज्याशी निगडित प्रमाणपत्रांवर ‘विवाहापर्यंत वैध’ अशी माेहर लावण्याचे आदेश दिले हाेते. ‘विवाहापर्यंत वैध’ या शिक्क्याने महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी हक्कदार ठरवले, म्हणजेच महिलांना समान अधिकारापासून वंचित ठेवले गेले. ३५-अ कलम हटवण्याच्या या निर्णयामुळे भेदभावाची प्रथा जपणाऱ्या निर्णयाला, संबंधित सर्व तर्कांना फटकारले आहे. काश्मिरी संस्कृतीच्या रक्षणासाठी केवळ महिलाच जबाबदार आहेत, या एका प्रमुख तर्काचा आधार दिला जात हाेता. काश्मिरातील महिला - मग ती हिंदू असाे की मुस्लिम - सुमारे ३० वर्षे आपल्या अधिकारापासून वंचित हाेती. काश्मिरी हिंदू महिला तर १९ जानेवारी १९९० च्या व्हर्च्युअल एविक्शन नाेटिसीचे लक्ष्य बनली हाेती. पाेस्टर आणि लाऊडस्पीकरवर घाेषणा दिली जात असे की, पुरुषांनी येथून चालते व्हावे परंतु महिलांनी येथेच थांबावे. काश्मिरी हिंदू पुरुषांना तीन पर्याय दिले गेले. त्यापैकी रालिव, त्सलिव अथवा गालिव (इस्लाम स्वीकारणे, स्थानांतर करणे किंवा नष्ट हाेणे असा याचा अर्थ हाेताे) परंतु हिंदू महिलांना सांगितले गेले की, आपण पाकिस्तानचा घटक बनू पाहत आहाेत, हिंदू महिलांसाेबत परंतु त्यांच्या कुटुंबातील पुरुषांशिवाय. काश्मिरी मुस्लिम महिलादेखील त्रस्त हाेत्या, काही महिलांचे पती दहशतवादी बनले आणि त्यांचा परित्याग करून निघून गेले हाेते. तर काही महिलांचे पती चकमकीत मारले गेले. महिलांमध्ये बळावत जाणाऱ्या कट्टरवादाचे नेतृत्व दुख्तरान-ए-मिल्लतसारख्या संघटनांनी केले हाेते, ही संघटना सेक्स सेग्रिगेशनचा पुरस्कार करते आणि जिहादचे समर्थन करते. चित्रलेखा झुुत्सी म्हणते, काश्मिरी समाजात जे परिवर्तन पाहायला मिळते त्यात महिलांचे याेगदान खूप माेठे आहे. पुरुषांच्या गैरहजेरीत महिलांनी घर आणि कुटुंबाची जबाबदारी हिमतीने सांभाळली आहे.


नकारात्मक परिस्थितीतदेखील प्रभावी भूमिका बजावणाऱ्या महिलांच्या गाेष्टी काश्मीरपुरत्याच मर्यादित राहिल्या. काश्मिरी साहित्यातदेखील याचे दर्शन घडते. शाेनालिका काैल (असोसिएट प्रोफेसर, सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीज, स्कूल ऑफ सोशल सायन्स, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) यांनी सांगितले की, ८ व्या शतकातील नीलम पुराण आणि १२ व्या शतकातील कल्हणच्या राजतरंगिणीमध्ये काश्मीरला देवी पार्वतीचे रूप मानले गेले. झेलम नदीलादेखील देशातील अन्य नद्यांप्रमाणेच शक्ती (नारीशक्ती) च्या रूपात मानले गेले. शाेनालिका म्हणते की, काश्मीरच्या उत्पत्तीविषयी पारंपरिक संदर्भ देताना म्हटले जाते की, हे महादेवाची पत्नी सतीचे सराेवर हाेते.


एखादे आधुनिक आंदाेलन आणि कायदा जाे काश्मिरी महिलांच्या अधिकारांचे सांस्कृतिक किंवा आर्थिकदृष्ट्या दमन करण्याचा प्रयत्न करताे तेव्हा केवळ काश्मीरचा इतिहास आणि वारसा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हाेत असताे.‘डाॅटर आॅफ वितस्ता’मध्ये प्रेमनाथ बजाज यांनी म्हटले की, फ्री काश्मीर (स्वतंत्र भारतात)मध्ये महिलांना समानतेचे अधिकार मिळतील अशी घाेषणा सर्वच पक्षांनी केली. अजूनपर्यंत हे चांगले इरादे प्रत्यक्षात अमलात यायचे आहेत. १९६९ मध्ये त्यांनी हे लिहून ठेवले आहे, त्यांचे म्हणणे खरे ठरवायचे की खाेटे हे काळच ठरवेल.


कावेरी बामजई, वरिष्ठ पत्रकार
[email protected]

X