आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात वेगवान बाइक 'निंजा एच 2आर' यासाठी विशेष...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कावासाकीने देशात सर्वात वेगवान फास्ट प्राॅडक्शन बाइक “निंजा एच २आर’ चे २०१९ मॉडेल सर्वात आधी  पुण्यात डिलिव्हर केले. या मॉडेलची देशात फक्त एकच बाइक आहे. किंमत ७२ लाख रुपये आहे. ही बाइक २६ सेकंदांत ४०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते.
सेल्फ हिलिंग पेंट : ओरिजनल सिल्व्हर मिरर-पेंट फिनिश िहला नवीन बनवून ठेवते. ड्युरेबल पेंट लहान-मोठेे स्क्रॅच आपाेआप चांगले करताे. यामुळे बाइकवर स्मूथ लेअर कायम असते. माेठी स्क्रॅच जात नाही, परंतु लहान स्क्रॅच दिसत नाही.


मर्यादित उपयोग : ही बाइक केवळ ट्रॅकवर उपयोग करण्यासाठी तयार केली आहे. हेडलाइट, टेल लाइट व मिरर यात दिलेले नाही.
सर्व्हिस इंटरवेल : या बाइकची सर्व्हिस तासांच्या पद्धतीने केली जाते. पहिली सर्व्हिस १५ तासांनंतर केली जाते.  कन्सोल सर्व जमा-खर्च स्वत:च करून घेताे. ८००० आरपीएम पेक्षा जास्त हाेताच हे प्रत्येक  मिनिट स्वत:च माेजू लागते.


काेणतीही वॉरंटी नाही : ७२ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यानंतर कंपनी याच्या काेणत्याही पार्टची  वॉरंटी देत नाही. सर्वच पार्ट "आउट ऑफ वॉरंटी' आहेत. एच २आरची सर्व्हिस फ्री नाही. प्रत्येक वेळी त्यासाठी पैसे लागतील.


कावासाकी "निंजा एच2आर' स्पेक्स...
इंजिन डिसप्लेसमेंट - 998सीसी
फ्यूल सिस्टिम - फ्यूल इंजेक्शन
इग्निशन - डिजिटल
ल्युब्रिकेशन - फोर्स्ड ल्युब्रिकेशन
ट्रान्समिशन - 6 स्पीड, रिटर्न
मॅक्स पॉवर - 310 एचपी@ 14000 आरपीएम
मॅक्स पॉवर विथ रॅम एअर - 326 एचपी@ 14000 आरपीएम
फ्यूल कॅपेसिटी - 17 लिटर
ग्राउंड क्लियरन्स- 130एमएम
कर्ब वेट - 216 किलो


'निंजा'संदर्भात हेही विशेष...
- १९८४ मध्ये "निंजा' ब्रँड सुरू झाला. याची पहिली बाइक हाेती "९००आर'.
- कावासाकीचे मार्केटिंग डायरेक्टरने हिला "निंजा' नाव दिले हाेते. यापूर्वी "पँथर'नाव वापरले जात हाेते.
- अनेक शर्यतीत एच २आरला प्रतिबंध आहे. यात सुपरचार्ज्ड इंजिन आहे. हे शर्यतीच्या प्रोटोकॉलचा विरुद्ध आहे.
- अमेरिकेत एच २आरची किंमत भारताच्या तुलनेत आर्धी आहे. भारतातील करांमुळे याची किंमत जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...