आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC 10: या सीजनच्या पहिल्या करोडपती बनल्या आसामच्या बिनीता जैन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क. कौन बनेगा करोडपती 10 ला या सीजनचा पहिला करोडपती मिळाला आहे. चॅनेलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ जारी करुन याची घोषणा केली आहे. सीजनच्या पहिल्या करोडपतीचे नाव बिनीता जैन आहे. या गुवाहाटी, आसाम येथील आहेत. या व्हिडिओमध्ये बिनीताला एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देताना दाखवण्यात आले. परंतु त्या 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात की, नाही हे अजुन सस्पेंस आहे. 


2 अक्टोबरला येणार एपिसोड: चॅनलने व्हिडिओ जारी करत लिहिले की, ज्ञानाच्या या दहाव्या अध्यायामध्ये आम्हाला पहिली करोडपती मिळाली. आता ती पुढेही पैसे जिंकू शकेल का? हे जाणुन घेण्यासाठी पाहत राहा केबीसीचा सप्तकोटी एपिसोड, 2 अक्टोबर रात्री 9 वाजता, अमिताभ बच्चनसोबत.


12 आठवडे चालणार शो
या वेळी प्रोग्रामची टॅग लाइन 'कब तर रोकोगे' अशी आहे. फॉर्मेटमध्ये काही खास बदल करण्यात आलेले नाही. काही नवीन फीचर अवश्य जोडण्यात आलेले आहेत. हा सीजन एकुण 12 आठवडे प्रसारित होईल. म्हणजेच सोमवार ते शुक्रवारपर्यंत एपिसोड चालतील. या शोची प्रसारणाची वेळ 9 वाजता आहे. तुम्ही हा कार्यक्रम Sony LIV app वरही पाहू शकता.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...