आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐकले का? 'केबीसी'च्या ग्रँड फिनालेमध्ये विशेष पाहुणा असेल कपिल शर्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कपिल शर्मा लवकरच आपला कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' घेऊन परत येत आहे. या बातमीमुळे त्याचे चाहतेदेखील खूप आनंदी आहेत. कपिल आपल्या शोच्या आधी एकदा टीव्हीवर दिसणार आहे. तो 'कोण बनेगा करोड़पती सीजन 10' ग्रँड फिनालेमध्ये विशेष पाहुण म्हणून उपस्थित राहणार आहे. कपिल या शोमध्ये आपल्या शोचे प्रमोशन करू शकतो. 


चॅनेलदेखील कपिलच्या शोला मोठ्या पातळीवर लाँच करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे 'कोन बनेगा करोडपती' पेक्षा चांगला प्लेटफॉर्म काय असू शकतो. याचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात. या शोची टीआरपीसुद्धा चांगली आहे. शिवाय कपिल, अमिताभ बच्चनचा मोठा चाहता आहे. अमिताभसोबत ग्रँड फिनालेमध्ये दिसल्यामुळे कपिलला त्याचा फायदा होऊ शकतो. alt147केबीसी 'चे फिनाले 23 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. या लवकरच याचे शूटिंग सुरू होईल त्यात कपिल पाहुण्याच्या भूमिकेत दिसेल. 


गेल्या वर्षी कार्यक्रम रद्द
खरंतर, गेल्या वर्षीदेखील 'कौन बनेगा करोडपती'चा विशेष भाग विनाेदवीर कपिल शर्मासोबत शूट केला जाणार होता. मात्र शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द झाला होता. तेव्हा FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लाइज)च्या स्ट्राइकमुळे रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...