• Home
  • TV Guide
  • KBC Amitabh Bachchan Kbc Share Story He Ask Father Strange Question

मित्रांच्या बोलण्यात येऊन / मित्रांच्या बोलण्यात येऊन जेव्हा अमिताभ यांनी वडिलांना विचारले होते - तुम्ही मला का जन्माला घातले?

दिव्य मराठी वेब टीम

Sep 05,2018 05:58:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्कः सोनी टीव्हीवर 'कौन बनेगा करोडपती' हा शो सुरु झाला असून शोचे होस्ट आहेत अमिताभ बच्चन. प्रत्येक सिझनप्रमाणे यंदाही अनेक कंटेस्टंट या शोमध्ये सहभागी होत असून त्यांच्या आयुष्यातील किस्से आणि घटना सांगत आहेत. अनेकदा अमिताभ बच्चन हे देखील त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत गोष्टी शेअर करतात. या सिझनच्या दुस-या दिवशी बिग बींनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत एक किस्सा शेअर केला. अमिताभ यांनी सांगितले की, एकदा त्यांनी रागाच्या भरात वडील हरिवंशराय बच्चन यांना विचारले होते की, तुम्ही मला का जन्माला घातले?

बिग बींनी सांगितला वडिलांशी निगडीत किस्सा...

अमिताभ यांनी सांगितले की, ते आणि त्यांचे मित्र तारुण्यात असताना नोकरी मिळत नसल्याने त्रासले होते. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना म्हटले की, कारण तुला तुझ्या वडिलांनी जन्माला घातले, म्हणून तुला नोकरी मिळत नाहीये.

- ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या मनात घट्ट रुजली. घरी आल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात वडिलांना विचारले की, तुम्ही मला का जन्म दिला? हे बोलून अमिताभ तेथून निघून गेले.

- दुस-या दिवशी हरिवंश राय बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी एक पत्र लिहून ठेवले होते, त्यात त्यांनी लिहिले होते, 'आयुष्यातील चढउतारांना घाबरुन माझा मुलगा मला प्रश्न विचारतो की, मी त्याला का जन्म दिला? आणि माझ्याजवळ या प्रश्नाचे काहीच उत्तर नाही. माझ्या वडिलांनीही मला न विचारता का जन्म दिला? आणि माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांनी का जन्म दिला होता?'

'रंग बरसे भीगे चुनर वाली..' गाणे हरिवंशराय बच्चन यांनी लिहिले होते..
हरिवंश राय बच्चन यांचा जन्म 1907 मध्ये प्रतापगढच्या पट्टी तहसीलच्या अमोढ गावात झाला होता. अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून हरिवंशराय बच्चन यांनी 1941-1952 पर्यंत इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभूत्व होते. हरिवंश राय आकाशवाणीच्या अलाहाबाद केंद्राशीही जुळले होते. त्यांनी चित्रपटांसाठी लेखन केले होते. 'सिलसिला' या चित्रपटातील 'रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे' हे गाणे त्यांनीच लिहिले होते. हे गाणे अमिताभ बच्चन यांनी स्वरबद्ध केले होते.

- हरिवंशराय बच्चन यांनी तीन खंडात त्यांची आत्मकथा 'क्या भूलूं क्या याद करूं' लिहिली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या बालपणापासून ते संघर्षापर्यंत आणि मुलगा अमिताभ बच्चनच्या सिनेसृष्टीतील प्रवेशाचे वर्णन केले आहे.

X
COMMENT