Home | TV Guide | Kaun Banega Crorepati Made 8 Ordinary Man Millionaire Anamika Majumdar To Harshwardhan Nawathe And Taz Mohammed Rangrez To Suishil Kumar

हे आहेत 'कौन बनेगा करोडपती'चे आतापर्यंतचे 8 विनर्स, कुणी करत आहेत समाजसेवा तर कुणी बनले IPS ऑफिसर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 12:53 PM IST

'कौन बनेगा करोडपती' (KBC) चे 10 वे पर्व 3 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे.

 • Kaun Banega Crorepati Made 8 Ordinary Man Millionaire Anamika Majumdar To Harshwardhan Nawathe And Taz Mohammed Rangrez To Suishil Kumar

  मुंबई - 'कौन बनेगा करोडपती' (KBC) चे 10 वे पर्व 3 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. 18 वर्षांपूर्वी 2000 मध्ये या शोला सुरुवात झाली होती. हा शो इंग्रजी गेम शो 'व्हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनेयर' वरून प्रेरणा घेऊन सुरू करण्यात आला होता. या शोचे 8 सिझन अमिताभ बच्चन यांनी तर एक सिझन शाहरुख खानने होस्ट केला होता.या शोमध्ये अनेक सामान्य व्यक्तींना मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्यामुळेच या शोच्या अनेक विनर्सचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. या पॅकेजद्वारे आम्ही तुम्हाला केबीसीच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक रक्कम जिंकलेल्या विनर्सबद्दल सांगणार आहोत. आता हे सर्वजण काय करत आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

  1. हर्षवर्धन नवाथे : या शोमध्ये करोडपती बनण्यात यशस्वी झालेले पहिले नाव म्हणजे हर्षवर्धन नवाथे. 2000 साली या शोमध्ये एक कोटी जिंकणारे नवाथे हे एका रात्रीतून स्टार बनले होते. पण त्या सर्व झगमगाटामध्ये त्यांचे शिक्षण मागे राहिले. त्यांनी UPSC सोडले आणि MBA केले. आज ते एका मोठ्या कंपनीत काम करतात. त्यांना दोन मुले आहेत.

  2. अनामिका मजूमदार : केबीसी-9 च्या पहिली कोट्यधीश या जमशेदपूरच्या राहणा-या अनामिका मजूमदार होत्या. अनामिका एक कोटी जिंकून 7 कोटींच्या जॅकपॉटसाठी कॉलिफाय झाल्या होत्या. पण त्यांनी प्रश्नाचे उत्तर न देता शोमधून क्वीट करण्याचा निर्णय घेतला होता. दोन मुलांची आई असलेल्या अनामिक सामाजिक सेविका असून 'फेथ इन इंडिया' नावाची एनजीओ चालवतात.

  पुढील स्लाइडवर वाचा, सर्वात लहान करोडपती बनला आयपीएस अधिकारी.. इतर सिझनमधील विजेत्यांबाबत..

 • Kaun Banega Crorepati Made 8 Ordinary Man Millionaire Anamika Majumdar To Harshwardhan Nawathe And Taz Mohammed Rangrez To Suishil Kumar

  रवी मोहन सैनी
  'कौन बनेगा करोडपती ज्युनियर' जिंकणाऱ्या रवीचे वय त्यावेळी अवघे 14 वर्ष होते आणि तो 10 वीच्या वर्गात शिकत होता. पण हा शो जिंकल्यानंतरही त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने पैसे कुटुंबीयांना दिले आणि शिक्षणात मन रमवले. आज तो एक आयपीएस अधिकारी बनला आहे. 

 • Kaun Banega Crorepati Made 8 Ordinary Man Millionaire Anamika Majumdar To Harshwardhan Nawathe And Taz Mohammed Rangrez To Suishil Kumar

  राहत तस्लीम

  मुलींना शिक्षणाचे स्वातंत्र्य नसलेल्या कुटुंबाची पार्श्नभूमी राहत यांना होती. लग्न झाले तेव्हा त्या मेडिकलचे शिक्षण घेत होत्या. पण त्यांच्या ध्येयाला या शोच्या माध्यमातून चांगलेच प्रोत्साहन मिळाले. त्यांनी 1 कोटी रुपये जिंकले होते. त्यातून त्यांनी एक शोरूम सुरू केले आणि आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. 

 • Kaun Banega Crorepati Made 8 Ordinary Man Millionaire Anamika Majumdar To Harshwardhan Nawathe And Taz Mohammed Rangrez To Suishil Kumar

  सुशील कुमार 

  बिहारच्या एका अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या सुशील कुमारने 5 व्या सीझनमध्ये 5 कोटी रुपये जिंकले होते. सहा हजार रुपये पगारावर नोकरी करणा-या सुशीलने जिंकलेल्या रकमेतून वडिलोपार्जित घराची डागडुजी केली आणि भावांना व्यवसाय सुरु करुन दिला. सुशील 100 गरीब मुलांनाही शिकवत आहेत. केबीसीमध्ये येण्यापूर्वी सुशीलचे एमएपर्यंत शिक्षण झाले होते. मनरेगामध्ये तो कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी करत होता. आता सुशील उर्दु शिकण्यासोबतच संगीताचे शिक्षण घेत आहे. 

 • Kaun Banega Crorepati Made 8 Ordinary Man Millionaire Anamika Majumdar To Harshwardhan Nawathe And Taz Mohammed Rangrez To Suishil Kumar

  सनमित कौर

  सनमित यांनी फॅशन डिझायनिंग केलेले होते. पण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना काम करण्यास मनाई केली. तरीही त्यांनी टिफिन बिझनेस सुरू केला. पण त्यातही अपयश आले. त्यानंतर त्यांनी मुलांचे ट्युशन सुरू केले. सनमित यांनी 6 व्या सीझनमध्ये 5 कोटी जिंकले होते. त्यातून त्यांनी मित्रासह एक फॅशन डिझायनिंग हाऊस सुरू केले. पण आता सनमित त्यात सहभागी नाहीत. 

 • Kaun Banega Crorepati Made 8 Ordinary Man Millionaire Anamika Majumdar To Harshwardhan Nawathe And Taz Mohammed Rangrez To Suishil Kumar

  ताज मोहम्मद रंगरेज
  सातव्या सीझनमध्ये ताज यांनी एक कोटी जिंकले होते. या पैशातून घर विकत घेणार आणि मुलीच्या डोळ्यांचा उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतरही त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू ठेवली. आज ते एक यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 

 • Kaun Banega Crorepati Made 8 Ordinary Man Millionaire Anamika Majumdar To Harshwardhan Nawathe And Taz Mohammed Rangrez To Suishil Kumar

  अचीन निरूला आणि सार्थक निरूला

  भारतीय टेलिव्हीजनच्या इतिहासात आतापर्यंत जिंकलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. दिल्लीच्या या भावंडांनी 7 कोटी रुपये जिंकताच त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले होते. या पैशातून त्यांनी आईच्या कँसरवर उपचार केले आणि स्वतःसाठी व्यवसायही सुरू केला. 

Trending