आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC: 'बिहार का लाला' सनोज बनला या सीझनचा पहिला करोडपती; सात वर्षांच्या प्रयत्नाला मिळाले यश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जहानाबाद - सोनी टीव्ही या वाहिनीवरील 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शो चा अकरावा सीझन सुरु आहे. पण अद्याप या सीझनमधील करोडपती या शो ला मिळाला नव्हता. अखेर बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील सनोज राज केबीसीच्या अकराव्या सीझनचा पहिला करोडपती बनला आहे. 15 प्रश्नांची अचूक उत्तरे देत सरोजने इथपर्यंत पोहोचला. सोनी वाहिनीवर गुरुवारी आणि शुक्रवारी हा एपिसोड प्रसारित होणार आहे. अकराव्या सीझनचे पहिले करोडपती झाल्यानंतर सनोज आणि त्यांच्या आई-वडिलांनी दैनिक भास्करशी बातचीत केली.  

सनोजने सांगतिले की, तो गेल्या 7 वर्षांपासून केबीसीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत होता.  केबीसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एसएमएसद्वारे प्रश्नाचे उत्तर पाठवत होता. पण केबीसीमध्ये त्याची निवड होत नव्हती. यावेळी केबीसीकडून फोन आल्यानंतर त्यांला विश्वास बसत नव्हता. नेहमीच टीव्ही आणि चित्रपटात पाहिलेल्या अमिताभ बच्चन यांना समोर पाहिल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.  

मुलगा 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहचणार, वडिलांना होता विश्वास
सनोजचे वडील रामजनम शर्मा यांनी सांगितले की, सनोज लहानपणापासूनच मेधावीत राहीला आहे. आमचा मुलगा मोठं नाव कमवणार याची आम्हाला खात्री होती. सरोजने जेव्हा फास्टेस्ट फिंगरचे उत्तर देऊन हॉट सीटपर्यंत पोहोचला तेव्हाच तो एक कोटीपर्यंतच्या प्रश्नापर्यंत पोहोचेल यावर विश्वास होता. 

सनोज आयएएस होऊ इच्छितो 
रामजनमने सांगितले की, आयएएस होऊन देश आणि समाजाची सेवा करण्याचे सनोजचे स्वप्न आहे. त्याने यूपीएससीची पूर्व परीक्षा देखील पास केली आहे. सनोजने आपले सुरुवातीचे शिक्षण जहानाबाद येथे केले. यानंतर त्याने पश्चिम बंगालमधून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरु असतानाच त्याचे टीसीएसमध्ये निवड झाली होती. यूपीएससीच्या तयारीसाठी त्याने अडीचवर्षांनंतर नोकरी सोडली. सनोजने काही दिवसांपूर्वीच सीएपीएफ(केंद्रीय शस्त्रास्त्र पोलिस दल) मधील सहाय्यक कमांडंटची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...