आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदार जाधव आता पूर्णपणे फिट; विश्वचषकात खेळणार; फिजिओ पॅट्रिक फरहार्टने सादर केला अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू केदार जाधव पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो आता विश्वचषकात खेळण्यास सज्ज झाला आहे. केदारच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. ३४ वर्षीय केदार ५ मे रोजी आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत करून बसला. त्याला लगेच मैदानाबाहेर नेले आणि त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. तेव्हा बीसीसीसीआयने म्हटले की, २३ मेपर्यंत केदार तंदुरुस्त होण्याची वाट पाहू. कारण २३ मे रोजी सर्व टीमममध्ये विश्वचषकात बदल करू. मात्र, केदार त्या तारखेच्या एक आठवड्यापूर्वीच तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले.


टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्टने केदारचा फिटनेस अहवाल सादर करत त्याला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे म्हटले. त्याची फिटनेस चाचणी गुरुवारी मुंबईत घेण्यात आली होती. आता तो १५ सदस्यीय टीमसोबत इंग्लंडला जाईल. भारताचा  पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्यापूर्वी भारतीय टीम २५ आणि २८ रोजी न्यूझीलंड व बांगलादेशसोबत सराव सामना खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...