Home | Gossip | kedarnath first song Namo Namo release

फर्स्ट सॉन्ग / 'केदारनाथ'चे पहिले गाणे 'नमो नमो' रिलीज, उत्तराखंडच्या सौंदर्यामुळे खिळून राहते नजर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 12:22 PM IST

हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

  • बॉलिवूड डेस्कः 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीवर आधारित असलेल्या केदारनाथ या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी ट्वीटवरवर गाणे शेअर करुन लिहिले, - आज #धनत्रोयदशीच्या शुभदिनी, भोलेनाथेचे नाव घेऊन... करुयात, #Kedarnath यात्रेचा आरंभ, #NamoNamo... हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

    नमो नमो हे गाणे शंकर देवाला समर्पित आ्हे. या गाण्यात सुशांत सिंग राजपूत तीर्थ यात्रींना आपल्या पाठीवर बसवून केदारनाथ धामचे दर्शन घडवताना दिसतोय. या गाण्यात केदारनाथचे सौंदर्य दिसते. हे गाणे अमित त्रिवेदी यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणे लिहिले आहे.

    या चित्रपटातून सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नितिश भारद्वाज, अलका अमीन, सोनाली सचदेव, पूजा गौर आणि निशांत दाहिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

  • kedarnath first song Namo Namo release
  • kedarnath first song Namo Namo release
  • kedarnath first song Namo Namo release

Trending