Home | Maharashtra | Mumbai | Kedarnath will release on its release date

'केदारनाथ'ला हिरवा कंदिल; मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका, धार्मिक भावना दुखावल्याचा होता आरोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 06:08 PM IST

हायकोर्टाचा केदारनाथ सिनेमाला हिरवा कंदिल

 • Kedarnath will release on its release date

  मुंबई- धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. एवढेच नाही तर सिनेमाच्या रिलिजला स्थगिती देण्यासही कोर्टाने स्पष्‍ट नकार दिला आहे. सिनेमाविरोधात अॅड. रमेशचंद्र मिश्रा आणि अॅड. त्रिपाठी यांनी दाखल केलेली जनहित याचिका कोर्टाने गुरुवारी फेटाळली.

  काय होते याचिकाकर्त्यांचे म्हणणे..
  - सेंसर बोर्डाने पुन्हा एकदा केदारनाथ सिनेमाच्या प्रमाणपत्रावर विचार करावा. कोणत्याही धार्मिक स्थळावर प्रेमाची गोष्ट दाखवणे म्हणजे त्या धर्मचा अपमान करणे आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.

  - परंतु हाय कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. चित्रपटातील 2 सीन्सला कात्री लावण्याच्या अटीवरून सिनेमा प्रदर्शित करावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

  आधीही वादाच्या भोवर्‍यात अडकला होता केदारनाथ..
  एखादा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, असे पहिल्यांदा घडले नाही. या आधीही प्रोड्यूसर्स आणि डायरेक्टर यांच्यात झालेल्या वादामुळे केदारनाथने शूटिंग थांबवण्यात आले होते.

  दरम्यान, 'केदारनाथ' हा सिनेमा उत्तराखंडमध्ये 2013 मध्ये आलेल्या प्रलयावर आधारीत आहे. मात्र, सिनेमाला 'प्रेमाची' झालर लावण्यात अाली आहे. चित्रपटात सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सारा ही अभिनेता सैफ अली खान याची कन्या असून ती या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Trending