आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरा : अजित पवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेताना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस व नागरिकांना धक्काबुकी झाल्याची घटना घडली आहे, असे प्रकार यापुढे होता कामा नयेत. या सर्व घटना लक्षात घेता अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. पवार यांनी गुरुवारी पुण्यातील २० गणपती मंडळांना भेटी दिल्या. 


सर्व धर्मांतील सण, महापुरुषांच्या जयंत्या यांना एकच फुटपट्टी लावावी. समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येऊ नये, हा श्रद्धेचा प्रश्न आहे. न्यायालयाचा निर्णयाचाही अवमान होऊ नये तसेच पर्यावरणही जपले गेले पाहिजे, अशी भूमिका या वेळी पवार यांनी मांडली. 

बातम्या आणखी आहेत...