आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायटिंग करताना या चार गोष्टी लक्षात ठेवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायटिंग करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. तुम्ही दीर्घ काळापासून विशिष्ट डायट फॉलो करत असाल आणि तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर अशा डायटमध्ये केल्या जाणाऱ्या काही चुका त्यास कारणीभूत ठरतात. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...

1.पनीर कच्चे खावे
असे म्हटले जाते की, तुम्ही डायटवर असाल तर पनीर खाणे चांगले असते. कारण यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. मात्र, पनीर फॅटयुक्त दुधापासून बनलेले असेल तर ते शरीराला फॅटशिवाय कोणतीच पोषक द्रव्ये देत नाही. त्यामुळे तुम्ही पनीर खरेदी करताना त्यात कोणती पोषक द्रव्ये किती प्रमाणात आहेत, हे अवश्य पाहा. पनीर कच्चे खाल्ले तर अधिक चांगले.

2.ज्यूसऐवजी फळे खा
तुम्ही मित्रांसोबत शीतपेयांऐवजी ज्यूस किंवा फळांचा रस घेत असाल तर ते फायद्याचे ठरणार नाही. फळांच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या ज्यूसमध्ये स्वीटनरचे प्रमाण अधिक असते. तुम्हाला ते पौष्टिक वाटत असेल, परंतु ते शरीराला पुरेशी पोषक द्रव्ये देण्यातही समर्थ नसते. त्यामुळे ज्यूस पिण्याऐवजी फळेच खावीत.

3. पॉपकॉर्न खाऊ नका
फिरायला गेल्यावर किंवा सिनेमा पाहताना समोसे किंवा पास्ता खाण्यापेक्षा पॉपकॉर्न चांगला पर्याय असल्याचा विचार अनेकजण करतात. मात्र, बाहेर मिळणाऱ्या पॉपकॉर्नमध्ये मीठ आणि लोणी अधिक असते, हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. त्यापेक्षा कमी तेल-मीठातील पॉपकॉर्न घरीच खावेत. बाजारात मिळणारे पॉपकॉर्न खाण्याचे टाळले पाहिजे.

4. सलाडमध्ये मीठ कमी घाला
तुम्ही डायटिंग करत असाल आणि सलाड जास्त खात असाल तर त्यामध्ये मीठाचे प्रमाण कमी ठेवलेलेच बरे. जास्त मीठ टाकल्यामुळे सलाडमधील पोषक द्रव्ये कमी होतात. अशाच प्रकारे फ्रूट सलाडसाठीही ताज्या फळांचा वापर करावा. सलाडवर जास्त सजावट करणेही टाळले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...