Disha Jeevanachi / 'शरीर, मन आणि भावनांचा ताळमेळ न जमल्यास तुम्ही तनावात येऊ शकतात'-सदगुरू जग्गी वासुदेव

प्रत्येक गोष्ट जशी आहे, तशीच पाहा

दिव्य मराठी वेब

Jul 07,2019 04:11:00 PM IST

जीवन मंत्र डेस्क- ईशा फाउंडेशनचे सदगुरू जग्गी वासुदेव यांनी आयुष्याला सरळ मार्गाने जगण्यासाठी काही सुत्र सांगितले आहेत. ज्याचे आचरन करून तुम्ही तनाव आणि त्रासापासून मुक्त होऊ शकतात. सदगुरूंनी सांगितल्यानुसर बहुतेक लोक स्वतःचा विचार आणि भावनांमुळेच तनावात असतात. कोणत्याही परिस्थितीत सदगुरूंनी सांगितलेल्या तत्वांनी वागल्यास सगळ्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.

सोपे आणि तनावरहित आयुष्य जगण्यासाठी सदगुरूंनी सांगितलेल्या या मार्गांनी चाला
1. अवघड गोष्टी सोप्या पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात, आपल्याला फक्त त्यांना मिळवण्यासाठी चांगला भाव ठेवून काम करावे लागेल.

2. लोकांना आपल्या मनावर ताबा का मिळवायचा आहे, त्यांनी आपल्या मनाला स्वतंत्र करायला हवे.

3. निराशा ठेवण्याचा अऱ्थ आपण स्वत: विरुद्ध काम करत आहोत.

4. प्रत्येक गोष्ट जशी आहे, तशीच पाहा.

5. तसे पाहीले गेले तर प्रत्येक इच्छा तुमची नसते. तुम्ही तर त्यांना आपल्या समाजाकडे पाहून आपले करतात.

6. जबाबदारी घेण्याचा अर्थ असा आहे की, आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटांचा सामना करणे.

7. कोणतेच काम तनावात करू नये. शरीर, मन आणि भावनांचा बरोबर ताळमेळ ठेवूनच कामे करावे.

8. कोणतेही काम करण्यासाठी निर्णय घ्या, आधीच आपले मत बनवू नका.

9. एकाद्यासोबत आपुलकी वाटणे हे त्या व्यक्तीमुळे होत नाही. ही तर मानवाची कमजोरी आहे.

X
COMMENT