आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या स्मार्टफोनच्या काळामध्ये रोज बाजारामध्ये काहीतरी नवीन उपलब्ध होत असते. आपण घेतलेला नवीन फोन हाताळण्याची सवय होण्यासाठी त्याचे अपडेटेड व्हर्जन बाजारात उपलब्ध असते. फोनच्या एवढ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत की, रोज नवनवीन फोन बाजारात उपलब्ध होत असतात. या महिन्यातही असेच काही नवे फोन बाजारात येत आहेत. या फोनचे फिचर्स आणि इतर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हे नवे फोन येणार बाजारात
बाजारात या महिन्यात उतरणार्या विविध फोन्समध्ये काही असे मॉडेल आहेत, जे लाँच होण्यासाठी यूझर्स अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. यामध्ये प्रामुख्याने Vivo X23, Vivo V11 Pro, Apple iphone 2018 चे तीन मॉडेल, Honor 8X max आणि Realme pro 2 यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
Vivo X 23 गुरुवारी (6 सप्टेंबर) लाँच झाला आहे. यात 3D फेस रिकग्निशन आणि 6.4 इंच फुल डिस्प्ले आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 चिपसेट आणि 8 जीबी रॅम उपलब्ध आहे.
Vivo V11 Pro मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह लाँच होणार आहे. ड्युअल कॅमेरा आणि फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. फोन 20 ते 30 हजारांच्या दरम्यान असेल.
पुढे वाचा इतर स्मार्टफोनबाबत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.