आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांनी सावध राजकारण करावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष राजकारण करताना पदोपदी तडजोड करतच असतात. त्यामुळे केजरीवालांनी तसे केले तर त्यासाठी त्यांना लगेच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची गरज नाही. केजरीवालांकडून जनतेला वेगळ्या अपेक्षा असल्या तरीही प्राप्त परिस्थितीची गरज म्हणून त्यांनी ही तडजोड स्वीकारली असावी. परंतु राजकारणाच्या दलदलीत रुतत जाण्याची हीच वेळ असते. अशा वेळी भविष्याचा अचूक वेध घेत पावले टाकली तर तुम्ही व्यवस्थित पुढे वाटचाल करू शकता. त्यासाठी असणारे समयसूचक भान केजरीवाल दाखवू शकतील का, याचे उत्तर मिळण्यास काही कालावधी जाऊ द्यावा लागेल.