आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाण्यावरून भाजपची दिल्ली सरकारवर टीका, केजरीवालांनी आरोप फेटाळला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत प्रदूषणाने गंभीर पातळी गाठल्यानंतर आता दिल्लीतील पाणीही दूषित झाले आहे. दूषित पाण्यावरून राजधानीमध्ये राजकारण पेटले आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षावर टीका केली आहे. केंद्र सरकार या प्रकरणावर राजकारण करू इच्छित नाही, परंतु दिल्ली सरकारने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारचा अहवाल राजकीय हेतूने सादर केलेला असून त्यात खोटी माहिती असल्याचे त्यांनी म्हटले होते. या अहवालात दिल्लीतील पाण्याची गुणवत्ता दूषित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी देण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे पासवान यांनी लोकसभेत सांगितले. पासवान म्हणाले की, भारतीय मानक मंडळाने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसंबंधित दिलेला अहवाल १६ नोव्हेंबरला माध्यमांसमोर सादर करण्यात आला. या यादीत दिल्लीचा क्रमांक सर्वात खाली आहे. राज्यातून घेण्यात आलेले सर्व ११ नमुने १९ मापदंडांवर अयशस्वी ठरले. हा अहवाल सरकारने राजकीय हेतूने सादर केल्याचा आरोप कोणताही मुख्यमंत्री करू शकत नाही. तसेच दिल्ली सरकारने विविध क्षेत्रातील पाण्याची गुणवत्ता तपासावी, असा उपाय पासवान यांनी सुचवला. पाणीप्रश्नी आम्हाला राजकारण करायचे नसून दिल्ली सरकारला या अहवालावर आक्षेप असल्यास त्यांनी आम्हाला सांगावे, त्यांना हवा असलेला अधिकारी समितीवर नेमण्यात येईल. यापूर्वी भाजपचे खासदार मीनाक्षी लेखी आणि मनोज तिवारी यांनी याप्रकरणी दिल्ली सरकारवर टीका केली होती. दरम्यान, दिल्लीतील पाणी प्रश्नावरून केंद्रीय मंत्र्यांनी केलेले वक्तव्य विरोधाभास दर्शवत असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी सोमवारी म्हटले आहे. या प्रश्नावर नेमके काय वक्तव्य करावे, हे मंत्र्यांनी आधी बैठक घेऊन निश्चित करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. खासदार सिंह संसद परिसरात पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी नुकतेच दिल्लीतील पाणी मानकाच्या निकषांप्रमाणे नसल्याचे म्हटले आहे, तर यापूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिल्लीत पाइपांद्वारे येणारे पाणी सर्व निकषांवर योग्य असल्याचे म्हटले होते. यामुळे मंत्र्यांच्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास स्पष्टपणे दिसत असल्याचे ते म्हणाले. तसेच अशा प्रकारचे निराधार वक्तव्य करून दिल्ली सरकारला बदनाम केल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीत प्रदूषणावर अभ्यासासाठी ओला-मायक्रोसॉफ्ट रिसर्चचा करार
 
दिल्लीतील गंभीर प्रदूषणावर उपाय शोधण्यासाठी ओला आणि मायक्रोसॉफ्ट रिसर्च या कंपनीने करार केला आहे. या अंतर्गत ते हवेची गुणवत्ता सुधारण्यासंबंधी माहिती एकत्रित करून सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावतील. या कराराअंतर्गत ओला मोबिलिटी संस्था आणि मायक्रोसॉफ्ट रिसर्च, विविध संशोधन करून सरकारला वेळोवेळी अहवाल सादर करतील. ज्याद्वारे प्रदूषण नियंत्रित करण्यात मदत मिळेल. या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना मायक्रोसॉफ्ट रिसर्च इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक वेंकट पद्मनाभन म्हणाले, “आमच्याकडे दीर्घ संशोधनाचा अनुभव असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढू शकतो. पाणीप्रश्नावर केजरीवालांचे पासवानांना आव्हान, दिल्लीतील पाणी शुद्धच

दिल्लीतील पिण्याच्या पाण्यावर सादर केलेल्या अहवालावर केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिल्ली सरकारवर जोरदार टीका केली होती. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पासवान यांच्यावर पलटवार करत दिल्लीतील पाण्याची गुणवत्ता अतिशय चांगली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून पाणीप्रश्नावर राजकारण केलेले जात आहे. ११ डागांवरून घेतलेल्या नमुन्यांच्या आधारे सर्व शहरातील पाणी दूषित अाहे, असे ठरवणे अयोग्य आहे. नमुने कुठून घेतले आहेत, याची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा अरोप त्यांनी केला. तसेच दिल्लीतील अनेक ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येणार असून पासवान यांनीही पाण्याची तपासणी करावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...