आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal Live In Delhi Latest News 2014 Election

केजरीवाल लाइव्ह: मोदी-राहुल यांच्याकडे पैसा, आमच्याजवळ ईश्वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. परंतु अत्यंत विचित्र विधान करून. मोठमोठी आश्वासने देणारे दिल्लीतून पाठीला पाय लावून पळाले. त्याला जबाब देताना केजरीवाल म्हणाले, मी कोणाच्याही मुलीला घेऊन पळून गेलेलो नाही.
दुर्याेधनाने भगवान श्रीकृष्णाकडे सैन्य मागितले होते. अर्जुनाने मात्र देवाची सोबत मागितली. आज मोदी आणि राहुल यांच्याकडे धनाचे बळ आहे. परंतु आमच्याकडे ईश्वर आहे.
केजरी राहुल यांना करतील पीएम : अश्विनी
पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी झालेले संस्थापक सदस्य अश्विनी उपाध्याय यांनी केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपचे उद्दिष्ट पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना पाठिंबा देणे, असे आहे. त्याबदल्यात काँग्रेस दिल्लीत मुख्यमंत्री पदासाठी केजरीवाल आणि हरियाणात योगेंद्र यादव यांचे समर्थन करेल, असे उपाध्याय यांनी ट्विट केले आहे.
फर्रूखाबादमध्ये उमेदवार कोण, पक्षाला ठाऊक नाही
फर्रूखाबादमध्ये केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे दोन-दोन दावेदारांनी तिकीट परत केले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 5 एप्रिलला तारिक परवेझ यांनी आपच्या चिन्हावरून अर्ज दाखल केला. परंतु याविषयी पक्षाच्या प्रदेश नेत्यांना कसलीही कल्पना नाही.